Gogavle Vs Tatkare : गोगावले-तटकरे संघर्ष वाढला? राष्ट्रवादीला धक्का लागताच, तटकरेंचा पलटवार; युवासेनेचे पदाधिकारीच फोडले

Raigad politics : रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडताना दिसत आहेत. यातच आता दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करणे सुरू केलं आहे.
Raigad politics Sunil Tatkare Vs Bharat Gogawale
Raigad politics Sunil Tatkare Vs Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्ह्यात भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात वाद सुरू असतानाच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

  2. तटकरेंच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश शिवसेना व गोगावलेंसाठी मोठा धक्का मानला जातो.

  3. या घडामोडींमुळे रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीतील खटके अधिक तीव्र झाले आहेत.

Raigad News : गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद पाहायला मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात मंत्री भरत गोगावले आणि इतर शिवसेनेचे आमदार उघड उघड भूमिका घेताना दिसत आहे. यादरम्यान तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. ज्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. तर या नेत्याच्या जाण्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच तटकरे यांनी गेम पलटवत युवा सेनेतील प्रमुख नेतेच राष्ट्रवादीत घेवून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

राजकारणात कधी कोण कुठे जाईल आणि कोण कुठे येईल याचा थांगपत्ता लावणे शक्य नाही. आगामी स्थानिकच्या आधीच अशाच पद्धतीने मोठ्या राजकीय हालचाली रायगडमध्ये होताना दिसत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार वाद आणि पक्ष वाढीची स्पर्धा सुरू झाली आहे.

दोन्ही पक्षाकडून एकमेकाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे प्रवेश घडवून आणले जात आहेत. अशातच तटकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नड गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांना गोगावले यांनी फोडले. त्यांचा कार्यकर्त्यांसह गोगावले यांच्या उपस्थित महाड येथे प्रवेश झाला. देशमुख यांच्या या प्रवेशाने गोगावले यांनी एकाच दगडात दोन निशाने साधल्याचे बोलले जात आहे. तर तटकरेंसह त्यांनी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगतात यांना जोरदार धक्का दिला असल्याचेही बोलले जात आहे.

Raigad politics Sunil Tatkare Vs Bharat Gogawale
Raigad Politics : रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; 'गोगावलेंना' शांत बसवण्यासाठी तटकरेंची जुन्या मित्राला साद?

यानंतर मंगळवारी (ता.30) मुंबई येथे रायगड जिल्ह्यातील काही महत्वाचे पक्षप्रवेश राष्ट्रवादीत झाले. ज्यात पनवेल, उरण येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीत युवासेना राज्य सचिव आणि कोकण समन्वयक रुपेश पाटील, समाजसेवक तेजस ढकी, युवासेना जिल्हा अध्यक्ष रोशन पवार, युवासेना विधानसभा अध्यक्ष रोशन कृष्ण पुजारी, खारघर उपशहर प्रमुख शैलेश शिंदे, खारघर महिला शहर प्रमुख चंचला संदेश बनकर, मुस्लिम युवा नेते हाजी मुद्दस्सर पटेल आदींनी प्रवेश केला.

यावेळी तटकरे यांनी, एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात आता राष्ट्रवादी प्रमुख पक्ष म्हणून काम करत आहे. जसा सचिन तेंडुलकर मॅचविनर खेळी करायचा तशीच मॅचविनर खेळी करुन भविष्यात आपल्या जिल्ह्यात पक्षाला बळ देऊ, असे आवाहन केले. तसेच त्यांनी शिवसेना शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यावरून उत्तर रायगड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता ताकद वाढणार आहे. उरणपासून पोलादपूरपर्यंत राष्ट्रवादी कार्यरत असून नव्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाचे संघटन अधिक भक्कम होईल, असा दावा केला आहे.

Raigad politics Sunil Tatkare Vs Bharat Gogawale
Guardian Minister of Raigad Politics : 'भरत'शेठच्या पालकमंत्री पदावर उदय शोधतोय राम'बाण' उपाय

FAQs :

प्र.१: रायगडमध्ये युवासेनेचे पदाधिकारी कोणत्या पक्षात दाखल झाले?
उ: युवासेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

प्र.२: या प्रवेशावेळी प्रमुख उपस्थिती कोणाची होती?
उ: खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

प्र.३: भरत गोगावले यांना या प्रवेशामुळे काय धक्का बसला?
उ: त्यांच्या विरोधातील गटाला बळ मिळाल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

प्र.४: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद कशामुळे तीव्र झाला?
उ: युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे वाद तीव्र झाला.

प्र.५: या घटनाक्रमाचा स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
उ: शिवसेना कमकुवत होऊन राष्ट्रवादीला स्थानिक स्तरावर अधिक बळ मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com