MLC Election : कोकणात पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने, अनिकेत तटकरे यांच्या नावाला विरोध; रायगडच्या जागेवरून महायुतीत मोठा संघर्ष उफाळला

Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यातील रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागासाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election; sunil tatkare Aniket tatkare, Vikas gogawale, bharat gogawale
Maharashtra Vidhan Parishad Election; sunil tatkare Aniket tatkare, Vikas gogawale, bharat gogawalesarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Dispute News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागासाठी निवडणूक कार्यक्रम झाला असून राज्यकीय वातावरण चांगलेच तापले. महायुतीमध्ये जागावाटपावरून तीन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे वृत्त धडकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात जागावाटपावरून खलबत सुरू आहेत. अशातच कोकणात मात्र शिवसेना आक्रमक झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या तिकीटावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १७ पैकी ६ जागांची मागणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं केली आहे. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर-जालना, नाशिक, जळगाव आणि परभणी-हिंगोली या सहा जागांवर शिवसेनेनं दावा केला आहे. पण भाजपने 4 जागा देण्याची तयारी दाखवल्याची सांगितले जात आहे.

अशातच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून आता महायुतीत पेच निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. रायगडमधून दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे नाव चर्चेच आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी खा. सुनील तटकरे जोर लावताना दिसत आहेत. अनिकेत तटकरे यांनी मागील निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवला होता.

Maharashtra Vidhan Parishad Election; sunil tatkare Aniket tatkare, Vikas gogawale, bharat gogawale
MLC Election : शिंदेंच्या शिवसेनेला हव्यात 6 जागा, भाजपने दाखवली 4 ची तयारी ; नाशिक व संभाजीनगरवरुन गाडी अडली

पण यंदा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेदेखील इच्छुक असल्याचे समजत आहे. याधी जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता. यातच आता पुन्हा विधान परिषदेसाठी दोन्ही नेत्यांचे पुत्र इच्छुक असल्याने गोगावले-तटकरे संघर्षाला धार येण्याची शक्यता आता रायगड जिल्ह्यात वर्तवली जात आहे.

कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेना आक्रमक झाली असून महाड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विकास गोगावले यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. तर अनिकेत तटकरे यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध दर्शवण्यात आला आहे. तसेच बैठकीत विकास गोगावले यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला असून, गरज पडल्यास मैत्रीपूर्ण निवडणूक लढण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे.

पक्षीय बलाबल पाहता कोकण विभागातील या मतदारसंघात शिवसेनेचे पारडे कमालीचे जड झाले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण ८३१ सदस्य संख्या आहे. यामध्ये एकट्या शिवसेनेच्या (शिंदे गट) सदस्यांची संख्या २८९ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ७७ जिल्हा परिषद सदस्य, १८ पंचायत समिती सभापती आणि १३२ नगरपालिका सदस्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपचे संख्याबळ २८५ असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सदस्यांची संख्या केवळ १०६ इतकी मर्यादित राहिली आहे.

तर कणकवली नगरपालिकेत शहर विकास आघाडीचे अध्यक्षासह ९ सद्यस्य आहेत. जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळ आहेत. पण अद्याप नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात हे पाहावं लागेल. पण ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ, त्याच पक्षाचा उमेदवार विधान परिषदेवर जावा, असा दावा आता शिवसेनेकडून केला जात आहे.

दरम्यान जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी थेट लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी, याआधी पक्षाचे प्रमुख शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही तटकरे यांना निवडूण दिले. मात्र आता २०२९ मध्ये आपण स्वत: इच्छुक आहोत. पक्षाने आदेश दिल्यास मैदानात उतरू. भविष्यात बघू, काय होतं आणि काय नाही. तर पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल.

दरम्यान विकास गोगावले यांचे 'भावी खासदार' अशा आशयाचे पोस्टर्स झळकले होते. तर गेल्या अनेक वर्षांपासून रायगडची ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने शिवसेनेकडून यावर दावा करण्यात आले आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उदान आले आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election; sunil tatkare Aniket tatkare, Vikas gogawale, bharat gogawale
Jalgaon MLC Election : जळगावच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक ; भाजपपुढे ठेवला जागा देता की लढता हा पर्याय!

जिल्हा परिषद बलाबल

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ५९ जागा असून भाजप-१५, शिंदेंची शिवसेना-२३, राष्ट्रवादी-१७ आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं ४ जागांवर विजय मिळवला आहे. रत्नागिरीत ५६ जागांपैकी १ अपक्ष, ४ जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून शिंदेंची शिवसेना मोठी ठरली आहे. येथे शिवसेनेचे ४१ सदस्य असून राष्ट्रवादीचे ५ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ५ सदस्य आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० पैकी सर्वाधिक २७ जागा भाजपने जिंकल्या असून त्यापाठोपाठ शिंदेंची शिवसेना १३ जागांवर आहे. तर ठाकरेंची शिवसेना ३ जागांवर विजयी झाली असून येथे ७ अपक्ष निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com