

रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानात कोयता घेऊन एक अर्धनग्न तरुण घुसला.
सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधित तरुणाला अटक केली.
या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
raigad News : रायगड जिल्ह्यात जशा नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या तेव्हा पासून येथे राडा आणि हत्ये सारख्या गंभीर घटना घडताना दिसत आहेत. अशा एका प्रकरणार मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला असून नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला आहे. या अशा तापलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा रायगडचे तापमान वाढले असून भाजप आमदाराच्या घरात कोयताधारी अर्धनग्नाने थरार उडवून दिला. दरम्यान वेळीच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला पकडल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. मात्र आता पुन्हा एकदा आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.
राज्याच्या राजकारणात गंभीर घटना होताना दिसत असून काहीच दिवसांच्या पूर्वी भाजप नेते नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याच्या बाहेर एक बॅग सापडली होती. ज्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर रायगडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यभर खळबळ उडवून दिली. यावरून येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
एकीकडे भाजपचे विधान परिषदेतील आमदार संजय केनेकर यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात एका बॅगमध्ये एअरगन सापडली होती. ज्यानंतर पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने सुत्रं हलवली. तपासाची चक्र फिरवली आणि या प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव रितेश संतोष होळकर असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंच्या तापासात या तरुणाची कोणतीच गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नसून एअरगन कशासाठी संपर्क कार्यालयात ठेवली याची कसून चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले असतानाच दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभेचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या निवास्थानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अर्धनग्न इसमाने कोयता घेऊन थरार माजवला. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. तर हा तरुण दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार या तरुणाने हातात घेऊन परिसरात धिंगाणा घातला होता. आमदार बालदी यांच्या निवास्थानात घुसण्याच्या आधी त्याने आजूबाजूच्या सोसायटीमध्ये कोयता दाखवत धमकवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर येथे भीतीचे वातावरण तयार झाले होते. यानंतरच स्थानिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली होती. तर आता पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची ओळख पटलेली नाही.
1. घटना कुठे घडली?
रायगड जिल्ह्यातील उरण येथे आमदारांच्या निवासस्थानी ही घटना घडली.
2. कोणत्या आमदारांच्या घरात घुसखोरी झाली?
उरण विधानसभेचे भाजप आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानी.
3. घुसखोराकडे काय होते?
तो कोयता घेऊन अर्धनग्न अवस्थेत घरात शिरला होता.
4. पोलिसांनी काय कारवाई केली?
सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी तत्काळ त्याला पकडले आणि अटक केली.
5. या घटनेनंतर कोणते प्रश्न उपस्थित झाले?
आमदारांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.