Raigad Politics : ‘भाजपमध्ये गेलो तर जिंकू’चा फुगा फुटला; रायगड 'झेडपी'त पक्षांतरवाल्यांचा धुव्वा

Shetkari Kamgar Party Politics : रायगड जिल्हा आणि विशेषतः पनवेल तालुक्याची ओळख ही एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला अशी होती. पण आता बदलत्या राजकीय समि‍करणांमुळे धोक्यात आली आहे.
Raigad Politics; Shetkari Kamgar Party Politics
Raigad Politics; Shetkari Kamgar Party Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  • पनवेल तालुक्यात शेकापचा पारंपरिक बालेकिल्ला 2026 च्या निवडणुकीत कोसळल्याचे स्पष्ट झाले.

  • शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मातब्बर उमेदवारांनाही मतदारांनी नाकारले.

  • यामुळे पक्षांतराचा फायदा भाजपलाही न झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

Raigad News : कधी काळी रायगड जिल्ह्यावर पकड असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. 2017 पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्तरांवर एकहाती सत्ता, अनेक दिग्गज नेत्यांसह माजी आमदार विवेक पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांसारखे यांसारखे प्रभावी नेते होते. ज्यांच्या बळावर शेकापने अनेक वर्षे तालुक्यात राजकीय पकड कायम ठेवली होती.

पण मात्र आता 2026 मध्ये महायुतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. यंदाच्या निवडणुकीत शेकापला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच ज्या काही मातब्बर नेत्यांना शेकापची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले त्यांनाही मतदारांनी नाकारले आहे. यामुळे शेकापचे अस्तित्वच धोक्यात आल्यासह मतदारांना जम्यात धरणे भाजपला अंगलट आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय समीकरणांना मोठा धक्का दिला आहे. अनेक वर्षे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राखणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) यंदा एकही जागा जिंकता आली नाही. या निकालामुळे शेकापच्या प्रभावाला मोठी उतरती कळा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही मातब्बर उमेदवारांनाही मतदारांनी नाकारल्याने पक्षांतराचा फायदा झाला नाही, हे अधोरेखित झाले.

Raigad Politics; Shetkari Kamgar Party Politics
Shetkari Kamgar Party : महाराष्ट्र दणाणून सोडणाऱ्या 'शेकाप'ची धुळधाण... 'सगळ्यांनी' मिळून काढला काटा!

शेतकरी कामगार पक्षाचा सातत्याने होत असलेल्या पराभवाचे सातत्य या निवडणुकीतही कायम राहिले. शेकापला पक्षफुटीचा मोठा फटका बसला. शेकाप सोडून भाजपत गेलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड. नीलिमा पाटील, माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील, पुत्र सवाई पाटील यांचा मोठा पराभव झाला.

रायगड जिल्ह्यात ही निवडणूक महायुतीच्या घटकपक्षांमध्येच लढवली. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे या लढतीला स्वरूप होते. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद जिल्ह्यात वाढत असल्याचा या निकालावरून दिसून आले. दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बहुतांश उमेदवारांना शिवसेनेच्याच उमेदवारांनी पराभूत केले. कर्जतमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.

या निकालात महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शेकाप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला. ५९ सदस्यीय जिल्हा परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेने सर्वाधिक २१ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने १६, तर भाजपने १५ जागा पटकावल्या. शिवसेना ठाकरे गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक ३० जागांचा आकडा कोणालाही गाठता आला नसल्याने सत्तास्थापनेसाठी युती अपरिहार्य ठरणार आहे.

पक्षीय बलाबल : जिल्हा परिषद

शिवसेना शिंदे गट - २१

भाजप - १५

राष्ट्रवादी काँग्रेस - १६

शिवसेना ठाकरे गट - ५

काँग्रेस - २

शेकाप - ०

पंचायत समिती

शिवसेना शिंदे गट - ३७

भाजप - २९

शिवसेना ठाकरे गट - १३

राष्ट्रवादी काँग्रेस - २८

शेकाप - ७

काँग्रेस - ४

Raigad Politics; Shetkari Kamgar Party Politics
Shetkari Kamgar Party : शेकापचे प्रितम म्हात्रेंचा शिक्षणसम्राटांना इशारा; महाराष्ट्र मच्छिमार सेनेचा मोठा निर्णय

FAQs :

1. पनवेल तालुक्यात शेकापची स्थिती का कमकुवत झाली?
मतदारांचा विश्वास कमी होणे आणि संघटनात्मक पकड सैल झाल्यामुळे.

2. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शेकाप नेत्यांना यश मिळाले का?
नाही, अनेक मातब्बर उमेदवार मतदारांनी नाकारले.

3. 2026 च्या निवडणुकांनी कोणता संदेश दिला?
पक्षांतरापेक्षा स्थानिक विश्वास महत्त्वाचा असल्याचा.

4. रायगडच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल?
पारंपरिक राजकीय समीकरणे बदलण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

5. शेकापसाठी पुढील आव्हान काय आहे?
संघटना मजबूत करणे आणि मतदारांचा विश्वास परत मिळवणे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com