

Kalpana Kharat: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून वावरत असताना शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्यानं चर्चेत आलेला भोंदूबाबा अशोक चव्हाण याला पाठीशी घालण्याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अशोक खरातवर ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्यादिवसापासून त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार होती. याच दिवशी उरणमधील जमीन ही कल्पना खरात यांच्या नावावर झाली आहे. याप्रकरामुळं स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना शेतकरी नेते राजाराम पाटील सांगतात, "ज्या दिवशी अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याची पत्नी कल्पना खरात या पोलिसांच्या लेखी फरार होत्या. त्यामुळं जर त्या फरार होत्या तर या जमिनीच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या कशा काय? त्यांच्यावतीनं खरेदीखत कसं काय झालं? फेरफार कसे पडले? आम्ही जर सातबारा काढायला गेलो तर इथले तलाठी, तहसिलदार लक्ष देत नाहीत. आम्ही गावठाणातला प्रश्न घेऊन गेलो तर तहसिलदार साध्या नोंदी घेत नाहीत पंचनामे करत नाहीत. त्यामुळं इथं जमीन खरेदीचं प्रकरण १०० कोटी रुपयांच्यापलिकडील आहे, त्यामुळं याची ईडीची चौकशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं करतो आहोत. जर त्यांनी हे केलं नाही तर आम्ही आंदोलन पुकारणार आहोत"
उरणच्या ज्या महसुली अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मदत केली आहे, त्यांचा मोठा प्रश्न आहे. कारण इतक्या फास्ट हे फेरफार कसे पडले? खरातचं प्रकरण हे उरणपर्यंत आले आहेत, ही गोष्ट धोकादायक आहे, त्यामुळं या प्रकरणी ईडी चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण इथले सरकारी अधिकारी, एजंट आणि जमीन देणारे असतील यांची चौकशी झाली पाहिजे. कारण जमिनीचा भाव नेमका किती दाखवला आहे. कारण ते रेडीरेकनपेक्षा कमी दरानं विकत घेतात. पण सध्या इथं ७-८ कोटी रुपये जमिनीचे भाव आहेत. सरकार जमीन लुटीसाठी खरात, सरकारी अधिकारी आणि महसूल अधिकारी हे सर्वजण एक आहेत, हे राजकीय मंडळी खरातच्या माध्यमातून गुंतवणूक करतात का? हा संशोधनाचा विषय आहे. या बाबांना जमिनी कशासाठी लागतात, त्यांच्याकडं हा पैसा येतो कुठून? हे जनतेला कळलं पाहिजे, असं शेतकरी नेते राजाराम पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.