

रायगड जिल्हा परिषदेत अर्थसंकल्प बैठकीदरम्यान शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद झाला.
शिवसेनेच्या मानसी दळवी यांच्यासह नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत इशारा दिला.
अखेरीस सर्व पक्षांना बैठकीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Alibag News : रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या आराखड्यावरून जिल्हा परिषद परिसरात मोठा राजकीय 'हाय ड्रामा' झाल्यानंतर तो लीक झाल्याची चर्चा जिल्हा भर पहायला मिळाली. यावरून नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्याविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डावलून भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घेतलेली बैठक आता वादाचे कारण ठरले आहे. या बैठकीची कुणकूण शिवसेनेला लागल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते. ज्यानंतर शेवटी शिवसेनेला सोबत घेण्याची वेळ भाजपसह राष्ट्रवादीवर आल्याचे दिसून आहे. यामुळे रायगड जिल्हा परिषदेत महायुती झाली तरी अंतर्गत कुरघोड्या कधी थांबणार अशी विचारणा आता येथे होताना दिसत आहे.
मंगळवारी (१७ मार्च) जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र यावेळी याची कोणतीच माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. तर राजकीय नेत्यांसह भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना घेत ही बैठक उरकण्याचा हेतू वाकडीकर यांचा होता. पण याची कुणकूण शिवसेनेला लागली आणि महायुतीतील अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली.
अध्यक्ष वाकडीकर यांनी भाजप नेते सतीश धारप, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, माजी अध्यक्षा निलिमा पाटील, गटनेते वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, सदस्य अमित नाईक यांना बैठकीला बोलावले होते. याच नेत्यांच्या समोर त्यांनी जिल्हा परिषदेचा कच्चा बजेट ठेवला. यावरून वादाला तोंड फुटले. तर शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी यांच्यासह इतर नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत असला प्रकार खपवून घेतला जाणार नाहीत, असा इशारा दिला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी, नियोजनाच्या नावावर बोलवण्यात आलेल्या बैठकीला शिवसेनेला स्थान दिले नाही, तर जे सदस्य नाहीत त्यांना का बोलवलं आहे. त्यांनाही या बैठकीत बसू देणार नाही, असा पवित्रा घेतला. ज्यानंतर येथील राजकीय वातावरण काही काळासाठी तणावाचे बनले होते. यानंतर तिन्ही पक्षांचे केवळ चार प्रतिनिधी घेवून बैठक घेण्याचा निर्णय झाला.
तर अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला. दरम्यान आता या अर्थसंकल्पाच्या अनौपचारिक बैठकीवरून पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष दिसून आला आहे. तर झालेल्या या गदारोळानंतर महायुतीमधील अंतर्गत वादाचे पुन्हा एकदा जिल्ह्यातील जनतेला दर्शन झाले आहे.
एकीकडे जिल्हा परिषदेत सर्वात मोठा ठरलेल्या शिवसेनेला डावलून सत्ता स्थापनेच्या हालचाली राष्ट्रवादी आणि भाजपकडून सुरू होत्या. पण एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या विनवण्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आणि रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन झाली. राष्ट्रवादी आणि भाजपच्या मनात नसतानाही शिवसेना सत्तेत समावून घ्यावे लागले.
पण तुझे माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना अशी परिस्थिती महायुतीतील तिन्ही पक्षांची झाली असून याचीच प्रचिती पुन्हा एकदा र्थसंकल्पावरील अनौपचारिक बैठकीच्या निमित्ताने आली आहे. तसेच या एकोप्यातही तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडत नसल्याचेही आता समोर आले आहे.
दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेण्यास तयार नसताना केवळ पक्षश्रेष्टींचे आदेश असल्याने शेवटच्या क्षणी सहभाग झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घ्यावे लागले. तर इच्छा नसूनही शिवसेनेला सोबत घेण्याची वेळ दोन्ही पक्षांवर आल्याने दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यां मोठी कोंडी झाली आहे. नाराज भाजप कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. यामुळेच जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेनंतर अलिबाग येथे होणारी सभा रद्द करण्यात आली. ज्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि खासदार सुनील तटकरे यांना सभा न घेताच परतावे लागले होते.
1. रायगड ZP मध्ये वाद का झाला?
अर्थसंकल्पाच्या चर्चेसाठी घेतलेल्या बैठकीत सर्व पक्षांना न बोलावल्यामुळे वाद झाला.
2. कोणत्या पक्षांमध्ये संघर्ष झाला?
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष झाला.
3. शिवसेनेची भूमिका काय होती?
शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत चुकीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा दिला.
4. बैठकीचा शेवट कसा झाला?
अखेर सर्व पक्षांना बैठकीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
5. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम होईल?
यामुळे स्थानिक राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.