Raigad Politics : रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-भाजपकडून शिवसेना सत्तेबाहेर : संतप्त भरतशेठ गोगावलेंचा भविष्यातील राजकारणावरून गंभीर इशारा

bharat gogawale warning mahayuti Over raigad zilla parishad : रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिंदेंच्या शिवसेनेला मिळणाऱ्या वागणुकीवरून मंत्री भरत गोगावले यांनी मित्रपक्षांना खडे बोल सुनावले आहेत
Raigad politics; Bharat Gogawale Vs Sunil Tatkare
Raigad politics; Bharat Gogawale Vs Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भरत गोगावले यांनी रायगड जिल्हा परिषदेत महायुतीने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली आहे.

  2. महाड येथे श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवादरम्यान त्यांनी मित्रपक्षांना स्पष्ट इशारा दिला.

  3. एकत्र न आल्यास आगामी लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

raigad News : रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असून राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सी खेच सुरू आहे. पण या सत्तासंघर्षात किंगमेकरच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीचा हात धरल्याने आता येथे भाजप, राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. तसेच येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठीच प्रदेशाध्य सुनील तटकरे यांनी ही खेळी खेळली असून ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेतले आहे. तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत पुढच्या बोलणीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेदरम्यानच भाजप नेते खासदार धैर्यशिल पाटील यांनी राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा केली. यामुळे आता भडकलेल्या मंत्री भरत गोगावले यांनी मित्रपक्षांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच भविष्यातील राजकारणावर गंभीर इशारा देताना आगामी लोकसभेसह इतर निवडणुकींचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते महाड येथील श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.

पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली 'मॅजिक फिगर' त्यांना गाठता आली नाही. त्यांचे २१ सदस्य असून बहुमतासाठी अजून नऊ सदस्यांची गरज आहे. यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आपल्या सोबत येईल असे म्हणत मुंबई आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह फडणवीस यांची भेट घेतली होती.

Raigad politics; Bharat Gogawale Vs Sunil Tatkare
Raigad Politics : ‘भाजपमध्ये गेलो तर जिंकू’चा फुगा फुटला; रायगड 'झेडपी'त पक्षांतरवाल्यांचा धुव्वा

मात्र त्या भेटीचा काहीच फायदा झालेला दिसत नसून उलट भाजप नेते खासदार धैर्यशिल पाटील यांनी राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा केली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तटकरेंची भेट घेतल्याने या युतीवर शिक्कामोर्तब झाला. ज्याचा परिणाम शिवसेनेला आता विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. या अशा राजकीय स्थितीमुळे मंत्री भरत गोगावले यांनी मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले आहेत.

गोगावले यांनी, राज्याप्रमाणेच रायगड जिल्हा परिषदेमध्ये ही महायुतीने एकत्र येणे आवश्यक असून विरोधात लढल्यास परिणाम दिसून आले आहेत. एकत्र न आल्यास आमची आवश्यकता नसल्यास भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधान परिषद निवडणुकी करता वेगळा विचार करावा लागेल असे म्हटलं आहे.

शिवसेनेवर परिणाम नाही

तसेच त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि तटकरे यांची वाढत जाणारी जवळीकतेचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर या दोन्ही नेत्यांनी, आणखी कोणाबरोबर जवळीक करावी हा त्यांचा प्रश्न आहे. तर ठाण्यातील शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण वादाचा फटका रायगडला बसतोय का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, शिवसेनेला अशा कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. शिवसेना मजबूत असून खंबीर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महाडमधील शिवभक्त आणि आपल्या कार्यकर्त्यांनी आराध्य दैवत श्री वीरेश्वराला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. तर हे साकडे निश्चित यशस्वी होईल असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त करताना आपण पालकमंत्री पदाबाबत आशादायी असल्याचे म्हटलं आहे.

Raigad politics; Bharat Gogawale Vs Sunil Tatkare
Raigad Politics : 'रायगडचा आका' म्हणणाऱ्या शिंदेंच्या शिलेदाराला तटकरेंनी दम भरला; नोटीस बजावत म्हणाले, 'उत्तर द्या, अन्यथा...'

FAQs :

1. भरत गोगावले यांनी नेमका कोणता इशारा दिला?
महायुतीने रायगड जिल्हा परिषदेत एकत्र न आल्यास आगामी निवडणुकांमध्ये वेगळा विचार करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.

2. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
महाड येथे श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

3. वाद नेमका कशावरून आहे?
जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य असूनही सत्तेत सहभागाबाबत निर्माण झालेल्या गुंत्यावरून हा वाद सुरू आहे.

4. या वादाचा लोकसभा किंवा विधान परिषद निवडणुकांवर परिणाम होईल का?
होय, महायुतीत एकजूट न झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसू शकतो.

5. पुढे काय होण्याची शक्यता आहे?
महायुतीतील पक्षांमध्ये चर्चा होऊन सत्ता समीकरण निश्चित होण्याची शक्यता आहे, मात्र राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com