Rajan Salvi : उच्च न्यायालयाचा आमदार राजन साळवींना मोठा दिलासा; काय आहे प्रकरण ?

Uddhav Thackeray Group : राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन
Rajan Salvi
Rajan SalviSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Political News : कोकणातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर रत्नागिरी अँटी करप्शन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या कुटुंबीयांना जामीन मंजूर करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. साळवी यांच्या पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यांचा मुलगा शुभम, पत्नी अनुजा यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवी हायकोर्टात धाव घेतली होती.

Rajan Salvi
Nana Patole : चव्हाणांच्या प्रवेशानंतर पटोले भाजपवर भडकले; म्हणाले, 'निर्लज्जपणाची काहीतरी...'

आमदार राजन साळवी त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी, मुलगा शुभम राजन साळवी यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर 2009 ते 2/12/2022 या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येऊन, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण तीन कोटी 53 लाख 89 हजार 752 रुपये, म्हणजेच 118.96 टक्के अपसंपदा संपादित केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर न केल्याने त्यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता.

Rajan Salvi
Mahadev Jankar News :महादेव जानकरांनी तोफ डागली; ‘भाजपसारखा दगाबाज दुसरा पक्ष नाही’

असा आहे गुन्हा...

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 (संशोधन 2018) चे कलम 13(1)(ब) सह 13(2) प्रमाणे तसेच राजन प्रभाकर साळवी यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम यांनी नमूद मालमत्ता ही अपसंपदा बाळगल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 18 जानेवारी रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कारवाईनंतर राजन साळवी आक्रमक झाले होते. आपण ठाकरे गटात निष्ठावंत असल्याने आपल्याला त्रास देण्यासाठीच अँटी करप्शन विभागाकडून ही कारवाई चौकशी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले होते. हायकोर्टाने जामीन मंजूर करत या प्रकरणी पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Rajan Salvi
Ashok Chavan in BJP : काँग्रेसला भगदाड पडणार? भाजपमध्ये प्रवेश करताच चव्हाणांचे सूचक विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com