Ratnagiri News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यातील विविध मतदारसंघाची चाचपणी आतापासूनच सुरु केली आहे. राजकीय नेत्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोकणात आणखी एका पुतण्याने काकाविरोधात रणशिंग फुंकले आहे.
राजकारणातील काका-पुतण्याचा संघर्ष राज्यासाठी नवीन राहिला नाही. यापूर्वी ठाकरे काका-पुतण्या, मुंडे काका-पुतण्या आणि पवार काका-पुतण्या असे अनेक संघर्ष राज्यात पाहावयास मिळाले आहेत. आता कोकणात देखील राजकारणातील काका-पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी आता तयारी सुरु केली आहे. (Ratanagiri Politics )
आगामी निवडणुकीत दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे आमदार आहेत. ते सध्या शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी केला आहे. अनिकेत कदम आता राजकारणात सक्रिय होणार आहेत त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांच्या या निर्धारामुळे काका पुतण्यामधील संघर्ष कोकणासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला देखील पाहायला मिळणार आहे.
साई रिसॉर्ट म्हणून जे प्रकरण गाजलं ते सर्व कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप वेळ सहन केले आहे. जिल्हाध्यक्ष संजय कदम यांना कसंही करून निवडून आणायचा निर्णय आता आम्ही केला आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी आम्हाला मानसिक खूप सपोर्ट केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले.
येत्या काळात आता आमचं कर्तव्य आहे, त्यांना निवडून आणायचे आहे. यापूर्वी देखील ते राष्ट्रवादीचे आमदार होते, आता ते शिवसेनेत गेले आहेत. त्याकाळी त्यांनी आम्हला खूप मदत केली होती. त्यामुळे आता आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, असे अनिकेत कदम म्हणाले.
रामदास कदम यांच्यावर प्रतिक्रिया देताना अनिकेत कदम म्हणाले की, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार.मी एक व्यावसायिक माणूस आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.