Congress -NCP Setback : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का, नगरसेविकेसह विरोधात लढलेल्या NCP च्या उदेवाराचे जात प्रमाणपत्र अवैध

Congress -NCP Setback in Ratnagiri rajapur municipality : राजापूर नगरपरिषदेत मविआला धक्का बसला असून नगरसेविकेसह दोघींचे पडताळणी समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरवले आहेत. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
Congress-NCP
Congress-NCPSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : राजापूर नगरपालिकेच्या डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवणूकीमध्ये प्रभाग-६ (अ) मधून निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज महमंद झारी यांच्यासह त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) निलोफर मुकादम या दोघींचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे, सदस्य सचिव शीतल सोनटक्के व सदस्य रवींद्र कदम यांच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय दिला आहे.

यामध्ये दोघींनाही उपविभागिय अधिकाऱ्यांनी दिलेले इतर मागार्स वर्ग जातीचे मूळ प्रमाणपत्र जप्त करून नस्तीबंद करावे, असे आदेशही समितीने काढले आहेत. समितीने काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अफरोज झारी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला आहे.

आता याप्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय देणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष आहे. नगर पालिकेच्या २०२५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग-६ (अ)मधून काँग्रेसच्या अफरोज झारी व महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निलोफर मुकादम यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढविली होती. त्यामध्ये काँग्रेसच्या श्रीमती झारी यांनी महायुतीच्या श्रीमती मुकादम यांचा पराभव केला होता.

Congress-NCP
NCP Setback : राष्ट्रवादीला मोठा धक्का! नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र रद्द : अपात्रतेची टांगती तलवार

दरम्यान, नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला आरक्षित असलेल्या या प्रभागातून निवडणूक लढविताना दोन्ही उमेदवारांनी सादर केलल्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेकडून जात पडताळणी समितीकडे पाठविला होता. यावर विविध पुरावे व साक्षीदार तसेच अर्जदार व तक्रारदार यांनी सादर केलेल्या विविध दस्तऐवजांची पडताळणी करून समितीने नुकताच निर्णय जाहीर केला आहे.

Congress-NCP
NCP Setback : राष्ट्रवादीला डबल झटका; एकाच वेळी नगराध्यक्षासह सभापतींचे जात प्रमाणपत्र ठरवले अवैध

जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेले आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले असून, मुख्याधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आता श्रीमती झारी यांच्या नगरसेवक पदाबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय येणार, याची उत्सुकता आहे. विद्यमान नगरसेविका अफरोज झारी या अपात्र ठरल्यास सत्ताधारी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या बहुमताला धक्का बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com