illegal bangladeshi woman : कोकणात बांगलादेशी महिलेची घुसखोरी, मुस्लिम मोहल्ल्यात सापडली अन्...; पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

fake pan card aadhar card case : बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी विरोधात राज्यात मोठी मोहिम हातात घेण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच याबाबत निर्णय घेत टास्क फोर्स तयार केले जाईल असे जाहीर केले आहे.
File Photo; illegal bangladeshi woman
File Photo; illegal bangladeshi womansarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबेड खुर्द येथे बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आलेली महिला राहत असल्याचे उघड झाले.

  2. तिने बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड तयार करून प्रशासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

  3. संगमेश्वर पोलिसांनी त्या महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

ratnagiri sangameshwar News : रत्नागिरी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केलेल्या एका महिलेने संगमेश्वरमधील आंबेड खुर्द येथे आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. तिने प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करून बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्डही तयार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी शुक्रवारी (ता.६) रात्री उशिरा धडक कारवाई करत, त्या बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आंबेड खुर्द येथील मुस्लिम मोहल्ल्यात राहणाऱ्या युसूफ महंमद सय्यद याने सिनेम युसूफ सय्यद ऊर्फ शांतना अहमद खान (मूळ रा. खिलगाव, जिल्हा गाजीपूर, ढाका, बांगलादेश) ही परदेशी नागरिक आहे, हे माहीत असतानाही तिच्याशी लग्न केले.

संशयित आरोपी युसूफने तिला केवळ आश्रयच दिला नाही, तर ती भारतीय नागरिक असल्याचे भासवण्यासाठी तिची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. या बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे कॅनेरा बँकेत खाते उघडून भारतीय प्रशासकीय आणि बँकिंग व्यवस्थेची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

File Photo; illegal bangladeshi woman
Ratnagiri Police : आरोपीला ‘हॉटेल ट्रीट’ देणं पोलिसांना भोवलं, पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होताच SP नीं घेतला मोठा निर्णय

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी (ता. ६) दुपारी संगमेश्वर पोलिसांनी आंबेड खुर्द येथील संशयित पत्त्यावर छापा टाकला. यावेळी ही महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात अवैधरीत्या वास्तव्य करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पारपत्र नियम आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅकेटची शक्यता

बांगलादेशमधील महिला कोकणात येऊन सरकारी कागदपत्रे बनवतेच कशी, यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून, पोलिस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.

File Photo; illegal bangladeshi woman
ratnagiri political clash : सामंतांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराचा पराभव, विजयानंतर कार्यकर्त्यांचा उन्माद, हातखंब्यात राडा! घरासमोर मिरवणूक, नारळ अन् फटाके फोडले

FAQs :

1. रत्नागिरीत नेमकी कोणती घटना उघड झाली?
बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात आलेली महिला संगमेश्वरमध्ये राहत असल्याचे समोर आले.

2. त्या महिलेवर कोणते आरोप आहेत?
तिने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून भारतात वास्तव्य केल्याचा आरोप आहे.

3. ही घटना कुठे घडली?
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे ही घटना उघड झाली.

4. पोलिसांनी कोणावर कारवाई केली?
त्या बांगलादेशी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5. ही कारवाई कधी करण्यात आली?
संगमेश्वर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा धडक कारवाई करून गुन्हा दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com