Eknath Shinde News : '...ॲापरेशन केलं, काही लोकांचे कमरेसह गळ्याचे पट्टे उतरवले', मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला

Loksabha Election : शिंदे यांनी महाविकास आघाडीला देखील टार्गेट केले. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांकडे ना कोणताही झेंडा आहे, ना कोणता अजेंडा. उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपल्याच पक्षाला वाचवू शकले नाहीत.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना तुफान फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे नाव घेता डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं आहे. काही लोकांचे गळ्याचे पट्टे काढले.', असा खोचक टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला. शिंदे यांनी महाविकास आघाडीला देखील टार्गेट केले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
ShivsenaUBT VS Congress : मुंबईतील जागेवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये वाद होणार? उमेदवार लागला कामाला...

महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांकडे ना कोणताही झेंडा आहे, ना अजेंडा. उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपल्याच पक्षाला वाचवू शकले नाहीत. त्यांनी पक्ष सांभाळावा, अशी टीका शिंदे यांनी केली. तर, श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांनी घोषित केल्याने आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती त्याला देखील शिंदेंनी प्रत्युत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उंट, शेळी सांभळणे घरात बसून शक्य होत नाही. त्यासाठी मैदानावर उतरावे लागते. दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा तुमच्या घरात काय सुरू आहे ते पहा, असा टोला शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला

खासदारापेक्षा मोठे पद देणार

रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे कौतुक मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. ग्रामपंचायत, नगरपालिका लढण्यासाठी किती चुरस असते. मात्र, तुमाने यांना यावेळी तुम्ही लढायचे नाही म्हणून सांगितले. दोन वेळा खासदार झालेल्या तुमाने यांनी माझे ऐकले. तुमचे यांना खासदारापेक्षा मोठे पद देणार, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिला.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Bachchu kadu News : बच्चू कडूंचा महायुतीला दणका; आघाडीच्या उमेदवाराला देणार राजकीय बळ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com