संजय दत्तला जामीन मिळवून देणारे मानेशिंदे उतरले नितेश राणेंसाठी मैदानात

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Sanjay Dutt and Satish Maneshinde
Sanjay Dutt and Satish ManeshindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नितेश राणेंच्या जामिनावर सुनावणी सुरू असून, ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. याच मानेशिंदे यांनी अभिनेता संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता.

आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत बंधू माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि वकील सतीश मानेशिंदे पोचले. न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत बाजू मांडत आहेत. नितेश राणे कायदेशीरपणे शरण आले नसल्याने त्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी घरत यांनी केली. याला मानेशिंदे यांनी आक्षेप घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, मानेशिंदे यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मिळवून दिला होता. याचबरोबर अभिनेता संजय दत्तच्या खटल्यातही तेच वकील होते. त्यांनी संजय दत्तला शस्त्रास्त्र प्रकरणात जामीन मिळवून दिला होता. तसेच, त्याला टाडाच्या आरोपातून सोडवले होते. अनेक बॉलीवूड तारे-तारकांचे खटले मानेशिंदे यांनी लढवले आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या प्रकरणातही तेच वकील होते.

Sanjay Dutt and Satish Maneshinde
मोठी घडामोड : नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक कणकवली पोलिसांसमोर शरण

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. नितेश राणे वकिलांसमवेत न्यायालयात हजर झाले. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. राणेंच्या जामिनावर वकिलांनी बाजू मांडली असून, पुढील सुनावणी आज होणार आहे. (Nitesh Rane News)

Sanjay Dutt and Satish Maneshinde
अटकेची टांगती तलवार असलेल्या गिरीश महाजनांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले. आता त्यांना अटक होणार की जामीन याचा फैसला सत्र न्यायालय घेणार आहे. (Nitesh Rane bail hearing)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com