Bharat Gogawale : राऊतांकडून शिवसैनिकांचा 'मुडदे' असा उल्लेख? गोगावलेंचा पारा चढला; म्हणाले 'आम्ही मर्द की...'

Bharat Gogawale On Sanjay Raut : संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विर्धापन दिनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनावर जोरदार टीका केली होती.
Sanjay raut, Bharat Gogawle
Sanjay raut, Bharat GogawleSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनी खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली होती. तसेच त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरूनही टीका केलीय. तर शिवसेनेच्या वर्धापन दिनी उपस्थित असणाऱ्यांना मुडदे महटलं होतं. यावरून आता नवा्या वादाला तोंड फुटले असून त्याला गोगावले यांनी प्रत्तुत्तर दिलं आहे.

राऊत यांनी, सध्या देशात D कंपनीचं राज्य असून एक डी म्हणजे डरपोकांची भाजप आणि दुसरे D म्हणजे महाराष्ट्रमधील D. दाऊद इब्राहिमपासून इक्बाल मिर्चीपर्यंत असे अनेक गुंड, पुंड, झुंड आणि त्यांचे हस्तक, देशद्रोही शक्तिंना घेऊन ही D कंपनी राज्य करत आहे. मात्र यांना एकमेव पक्ष ताकदीने लढतोय, छातीवर वार झेलतोय आणि यापुढेही लढत राहील तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. पण त्यांची शिवसेना मुडद्यांची अशा शब्दांत त्यांनी शिंदेवर आणि शिवसेना सोडून जाणाऱ्यांवर निशाणा साधला होता.

त्यावरून शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार पलटवार केला आहे. गोगावले यांनी, आमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लोक होते की मुडदे हे पाहायला ते आले नाहीत. पण जर ते पाहायला आले असते तर त्यांना शिवसेना दिसली असती. आमच्या सभागृहामध्ये पाय टाकायला जागा नव्हती. गॅलरी पूर्ण भरलेली होती. खाली-वर संपूर्ण जागा भरली होती. लोक उभं राहून ऐकतं होती, एवढी गर्दी होती.

Sanjay raut, Bharat Gogawle
Bharat Gogawale Controversy : अघोरी पूजेचा आरोप झालेल्या भरत गोगावलेंचा रायगडावर नवस? संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

आता या गर्दीला हे मुडदे म्हणत असतील तर लोकच त्यांना धडा शिकवतील. येत्या महानगरपालिका नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला आम्ही त्यांना दाखवून देऊ. आम्ही मुर्दे आहोत का मर्द आहोत हे देखील येणाऱ्या निवडणुकीला दाखवून असेही इशारा गोगावले यांनी दिला आहे.

Sanjay raut, Bharat Gogawle
'तर पालकमंत्री झालो असतो' : Bharat Sheth Gogawale on Aghori Puja Video | Karjat Raigad Shivsena News

राऊतांनी गोगावलेंवर केली होती टीका

संजय राऊत यांनी, शिंदे यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. कारण दिवसरात्र ते अघोरी विद्येत गुंतलेले असतात. दुसऱ्याचं आणि राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल? ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात जेव्हा आपण पुरोगामी म्हणून मिरवतो, त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य आता समोर येत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण जर अशा लोकांच्या हातात असेल तर हे शाहू-फुले- आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून बघायला पाहिजे नक्की काय आहे? काहीही होऊ शकते, असे राऊत यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com