Bharat Gogawale Controversy : अघोरी पूजेचा आरोप झालेल्या भरत गोगावलेंचा रायगडावर नवस? संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

Raigad Fort Bharat Gogawale Sambhaji Brigade : रायगडावर नवस बोलला जात असेल तर ते अत्यंत दुर्देवी आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही गोगावलेंचा निषेध करतो, असे संतोष शिंदे म्हणाले.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Bharat Gogawale News : पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आला होता.राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी गोगावलेंचा पूजा करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यावर आपण केवळ पूजा केली अघोरी पूजा नाही, असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले होते. आता पुन्हा एकदा गोगावलेंवर मंत्रि‍पदासाठी रायगडावर नवस केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

संभाजी ब्रिगडेचे संतोष शिंदे म्हणाले, भरत गोगावले मंत्रि‍पदासाठी रायगडावर नवस बोलले होते आणि गोगवले यांनीच ते मान्य केले आहे.त्यामुळे मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. रायगडावरील अघोरी कृत्याचा, नवसाचा जाहीर निषेध आम्ही करतो. गोगावलेंनी महाराष्ट्राची माफी मागावी.

गोगावलेंनी मंत्रि‍पदासाठी रायगडावर नवस केला आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी तो फेडला, हे मी नाही सांगत तर त्यांच्या सोशल मीडियावर त्या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांकडूनच नियमांची पायमल्ली होत असेल तर अंधश्रद्धा विरोधी कायदा नाही का? असा सवाल देखील संतोष शिंदे यांनी उपस्थित केला.रायगडावर नवस बोलला जात असेल तर ते अत्यंत दुर्देवी आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही गोगावलेंचा निषेध करतो.

Bharat Gogawale
MNS BJP Congress politics : हिंदीसक्ती वादामागे नानांना वाटतेय राज-फडणवीसांची 'मिलीभगत'

गोगावले यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद दिले नाही तर त्यांच्या अघोरी कृत्यामुळे ते मंत्री झाले, असा अर्थ निघतोय. रायगडवार ते नवस करून शिवप्रेमींच्या मनात शिवाजी महाराजांचे आदराचे स्थान आहे त्यालाच छेद देण्याचा काम केले जातय. उद्या रायगडावर नवसाचे बोकडे कापले जातील, त्यामुळे गोगावलेंवर कारवाई करावी, असे देखील संतोष शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या टार्गेटवर गोगावले

मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री आदिती तटकरे यांचा देखील पालकमंत्रिपदावर दावा कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाण्यावर भरत गोगावले आहेत. गोगावले अघोरी पूजेचे व्हिडिओ राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शेअर करण्यात येत आहेत. त्यातच गोगावले हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.

Bharat Gogawale
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार एकाच समितीत, नेमकं काय काम करणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com