आता जिरली का? राणेंच्या 'गाडलाच'ला सतीश सावंतांचे प्रत्युत्तर

संतोष परब हल्ला प्रकरणावरून नितेश राणे यांना सतीश सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Satish Sawant and Nitesh Rane
Satish Sawant and Nitesh Ranesarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. राणे हे पोलीस कोठडीत असून, त्यांना चौकशीसाठी आता कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून हा सर्व प्रकार झाला होता. आता यावरुन शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने (BJP) बाजी मारली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख व बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Savant) हे ईश्वर चिठ्ठीवर पराभूत झाले होते. त्यावेळी आमदार राणे यांनी फेसबुकवर गाडलाच अशी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सतीश सावंत यांच्या डोक्यावर राणेंनी पाय ठेवला आहे, असे व्यंगचित्र होते.

Satish Sawant and Nitesh Rane
मोठी घडामोड : परब हल्ल्याचा कट पुण्यात आखला; राणेंना तपासासाठी पुण्याला हलवणार

परब हल्ला प्रकरणी गायब असतानाही राणेंनी ही फेसबुक पोस्ट केली होती. आता सावंत यांनी राणे हे पोलीस कोठडीत असताना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या निकालानंतर माझी सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. माझी जिरवल्याची व्यंगचित्रे पोस्ट केली होती. माझी जिरवताना आमदार नितेश राणेंना काल तुरुंगात रात्र काढल्यानंतर त्यांचीच कशी जिरली हे समजले असेल. केंद्रीय मंत्री नारायण रामे हे पुत्रप्रेमापोटी संसद आणि मंत्रालयाचे कामकाज सोडून कणकवलीत तळ ठोकून होते. आधीच्या लोकप्रतिनिधींनी असे कधीही केले नव्हते. कधी अधिकाऱ्यांवर चिखलफेक तर कधी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्या आमदाराला तुरुंगात जावे लागले आहे.

Satish Sawant and Nitesh Rane
मोठी बातमी : गल्वान खोऱ्यात चीनचे नऊपट अधिक सैनिक मारले गेले

आम्ही काहीही केले तरी आमचे कुणी वाकडे करू शकत नाही, अशी घमेंड नितेश राणेंना होती. पैशाच्या जोरावर काहीही करता येते, या भ्रमात ते होते. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर त्यांची घमेंड उतरली असेल. शिवसैनिक याआधीही राणेंच्या दहशतीला घाबरले नाहीत. ते यापुढेही राणेंचा दहशतवाद सहन करणार नाहीत. मूर्ती लहान पण किर्ती महान, अशी म्हण आहे. आता मात्र, मूर्ती लहान पण अपर्किर्ती महान अशी म्हण रूढ होईल, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com