
Raigad Svivsena Vs NCP News : रायगडमधील पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात वाद चिघळताना दिसत आहे. तटकरे यांनी गोगावलेंची नॅपकीन नक्कल करून वादाला तोंड फोडले आहे. तर गोगावलेंनी देखील यावर प्रत्त्युतर देताना हॉटेलातील वेटर असे म्हणत टोला लगावला आहे. दरम्यान या वादाची झळ महायुतीला आता बसली असून आगामी स्थानिकच्या निवडणुकीत जिल्ह्यात फक्त युती होईल महायुती नाही अशी घोषणा शिंदेंच्या आमदारांनी करून रायगडच्या पालकमंत्री शिवसेनेचाच असेल तोही भरतशेठच होईल असा ठाम दावा केला आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिंदेंच्या आमदारानं थेट तटकरेंना राजीनामा देवून निवडणुकीच्या मैदानात येण्याचे आव्हान दिले आहे. यामुळे आता हा वाद थांबणार नसल्याचेच उघड होत आहे.
रायगडमधील महाड येथे गोगावलेंच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा झाला. या सोहळ्यात शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपद आणि गोगावलेंची नक्कल केल्याने तटकरेवर (Sunil Tatkare) सडकून टीका केलीय. तसेच येथून पुढे फक्त युती असेल शिवसेना आणि भाजपच स्थानिकला लढेल. तटकरेंना येथील राजकारण घेणार नाही, अशी घोषणा केला होती.
ज्यानंतर राष्ट्रवादीने देखील पलटवार करताना मुख्य प्रवक्ते आनंद परांजेपे यांनी जोरदार टीका केली होती. तर पुन्हा एकदा मुघलांच्या वंशाजांनी गरळ ओकली. 2029 मध्ये सुनील तटकरेच लोकसभेत विजय होतील. त्यावेळी यांनी ज्या रूमालाचा उल्लेख केला त्यानेच तोंड लपवावे लागेल असा हल्लाबोल केला. यावरून आता शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच कोण आनंद परांजपे? परांजपे हा दीडदमडीचा अशी तिखट टीका अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलीय.
दळवी यांनी परांजपे यांच्यावर टीका करताना, तटकरे यांनी पाळलेले परांजपे हे प्राणी असून दुसऱ्या प्रवक्त्याने अशा पद्धतीने वक्तव्य करू नये अन्यथा आमचा पूर्व इतिहास तटकरे यांना सुद्धा माहित आहे, असाही इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांना दिलाय. दळवी यांनी तटकरे यांना आम्ही निवडून आणले असून त्यांनीच आमचा उलटा गेम करायचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही दळवी यांनी केलाय. तर परांजपे यांनी तटकरेंबद्दल केलेल्या दाव्यावरून 2029 कशाला तटकरे यांनी आत्ताच राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानच दिले आहे. तर तटकरे यापुढे निवडून आले तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. याच्याआधी आम्ही त्यांना मदत केली. मात्र आती ती वेळ निघून गेली असून यापुढे असे होणार नाही. यामुळे तटकरे यांनी त्यांचे सगळे खेळ बंद करावेत, अन्यथा... असाही सज्जड दम दळवी यांनी दिला आहे.
महाडमध्ये तटकरे यांच्यावर शिवसेनेच्या दोन्ही आमदारांनी जोरदार टीका केली होती. तर दळवी यांनी केलेल्या टीकेलाराष्ट्रवादी मुख्य प्रवक्ते आनंद परांजेपे यांनी प्रत्युत्त देताना मुघलांच्या वंशाजांनी गरळ ओकली असे म्हटलं होते. तसेच 2029 मध्ये जिल्ह्याचे खासदार तटकरेच होतील. त्यावेळी ज्या रूमालाचा उल्लेख हे करत आहेत. त्यांना त्याच रुमालाने आपला चेहरा लपवावा लागेल आणि पुढील आयुष्य जगावे लागेल. तशी वेळ रायगडची जनताच आणेल असा हल्लाबोल केला होता.
तटकरे यांच्यावर शिवसेनेचे मंत्री असो किंवा दोन्ही आमदार हे सतत खालच्या पातळीवर टीका करत असतात. हे सर्व महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असून महेंद्र थोरवे यांचेच खास आश्चर्य वाटतं असून जे स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणतात. पण यांचा मुळातच शिवसेनेत प्रवेश हा 2019 मध्ये झाला आहे. गुवाहाटीमध्ये नाचतानाचे तुमचे डान्सबारचे संस्कार अखंड भारताने पाहिल्याचा टोला लगावताना तटकरे यांच्या नादाला लागू नका, असा सल्ला परांजपे यांनी दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.