Ratnagiri Politics : किरण सामंतांच्या 'डीपी'ला ठाकरे गटाची 'मशाल'; बंधूराज उदय सामंतांच्या पावलांवर पाऊल ?

Uday Samant & Kiran Samant : टॅक्टिज,प्रेशर टॅक्टिज आणि राजकारणातील वाऱ्याचा पुरता अंदाज हे उदय सामंतांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिले आहे .
Kiran Samant News
Kiran Samant NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri Politics : राजकारणात नातलगांनीही पावलांवर पाऊल ठेवत प्रवेश करणे ही आता पाऊलवाट राहिली नसून तो आता राजरोस रस्ता झाला आहे. शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आपल्या व्हाट्स अॅप 'डीपी'ला ठाकरे सेनेची मशाल हे चिन्ह ठेवले. .यातून त्यांनी आपल्या बंधू राजाच्या राजकीय पावलांवर पाऊल ठेवून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक स्वतः लढवण्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.

शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 'मशाल' या चिन्हाचा डीपी काही काळ आपल्या मोबाईलवर लावणे हा त्यांच्या राजकारणातील 'प्रेशर टॅक्टिज' चाच भाग होय. बंधू आणि मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांच्या राजकारणातील प्रवेशापासून ते आतापर्यंतचे सर्व सूत्रे हाताळत असलेले किरण सामंत ठाकरे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा या मोबाईलवरील डीपीने सुरु केली असली तरी तूर्तास तरी हा त्यांचा राजकारणातला स्वतःचा राजकीय 'डेव्हलपमेंट प्लॅन'आहे.

Kiran Samant News
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ? शिंदे-फडणवीस तडकाफडकी दिल्लीत; अजितदादा नाराज ?

तूर्तास् ती'प्रेशर टॅक्टिज'आहे.उदय सामंतांचे राजकारण हे कधीच पावला मागून पाऊल असे सरळ नव्हते ते सतत चालीचेच राहिलेले आहे.किरण सामंतांची(Kiran Samant) पावलेही याच चालीची पडत आहेत. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असताना बंधू उदय सामंत यांच्याकडे राष्ट्रवादी बरोबरच त्या काळातल्या अखंड शिवसेनेचाही एबी फार्म होता. यावरून एकूणच राजकारण लक्षात यावे.

किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत 2004 मध्ये रत्नागिरीचे तत्कालीन भाजपा आमदार बाळ माने यांना धोबीपछाड देत राष्ट्रवादीतून आमदार झाले. 2009 मध्ये ही त्यांनी राष्ट्रवादीतून पुन्हा विजय मिळविला. 2014 मध्ये भाजप आणि त्यावेळची अखंड शिवसेना वगळता राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या पक्षांचा कठीण काळ सुरू झाला होता. राष्ट्रवादी मधूनही मोठी ओहोटी सुरू झाली होती. रत्नागिरी सिंधुदुर्गात ही राष्ट्रवादीत मोठी गडबड झाली होती.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सावरायला उदय सामंत यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली होती.राष्ट्रवादी सावरण्याची भाषणे देता देताच ऐनवेळी उदय सामंत त्या वेळेच्या अखंड शिवसेनेत गेले.राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडचिठ्ठी दिली.निवडणुकीत उदयसामंत यांच्याकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांचेही एबी फार्म होते.(Shivsena Political News)

उदय सामंत यांच्या 'राजकीय टॅक्टिज अशा पावरफुल होत्या. म्हाडाचे अध्यक्षपद, कॅबिनेट मंत्रिपद पालकमंत्री पद अधिक उदय सामंतांनी अखंड शिवसेनेत उपभोगली. 2019 मध्ये ही अखंड शिवसेनेतून हाच कित्ता उदय सामंत यांनी पुढे चालवला. 2022 मध्ये" गुवाहाटी घडले, उदय सामंतांनाही हिंदुत्व 'अडचणीत असल्याचा साक्षात्कार झाला.ते तिकडे गेले, मंत्रिपद कंटिन्यू झालेच पण पक्षात त्यांचे 'फुटेज'ही कितीतरी वाढले.

Kiran Samant News
Shrirampur Politics : काँग्रेसच्या 'जनसंवाद' यात्रेला गटातटाच्या राजकारणाचं ग्रहण; श्रीरामपूरमध्ये आमदार कानडेंचे 'एकला चलो रे'!

"टॅक्टिज," प्रेशर टॅक्टिज"आणि राजकारणातील वाऱ्याचा पुरता अंदाज हे उदय सामंतांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिले आहे . उदय सामंत यांचे 'किंगमेकर' म्हणून पडद्याआडून भूमिका बजावणारे किरण सामंत मात्र डीपी ठाकरे गटाचा लावून आपला रोख 'इशारा' म्हणून स्पष्ट करतात.हे किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आहे.किंबहुना त्याच चालीचे हे पाऊल आहे!

तूर्तास रत्नागिरी लोकसभेच्या रिंगणात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत ,भाजपाचे रिफायनरी समर्थक म्हणून प्रबळ दावेदारी सांगणारे प्रमोद जठार आणि किरण सामंतही चर्चेच्या पहिल्या फेरीत दाखल झाली आहे हा एका वाक्यातील निष्कर्ष सांगता येईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Kiran Samant News
Shrirampur Politics : काँग्रेसच्या 'जनसंवाद' यात्रेला गटातटाच्या राजकारणाचं ग्रहण; श्रीरामपूरमध्ये आमदार कानडेंचे 'एकला चलो रे'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.