Bhaskar Jadhav : भास्कर जाधव पुन्हा नाराज? माजी खासदाराबरोबर बिनसल, उचललं थेट पक्षाविरूद्धच पाऊल

Bhaskar Jadhav Upset In Shivsena Over Vinayak Raut : भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील विसंवादामुळे चिपळूणमध्ये शिवसेनेत फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चिपळूणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटात मोठा विसंवाद निर्माण झाला असून आमदार भास्कर जाधव उघडपणे नाराज असल्याचे समोर आले आहे.

  2. जाधव स्वतःच्या पक्षाला पाठिंबा न देता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

  3. जाधव–राऊत विसंवादामुळे चिपळूणमधील शिवसेनेत मोठी फूट पडली असून निवडणुकीच्या तोंडावर हे गंभीर संकट मानले जात आहे.

Ratnagiri News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उभी फूट पडल्याचे समोर आले आहे.

येथे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भास्कर जाधव नाराज असल्याचे उघड झाले आहे. चिपळूणमध्ये शिवसेना मैदानात असतानाही ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत. यामुळे भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील विसंवादाचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता येथे वर्तवली जातेय.

चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 24 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र, भास्कर जाधव हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचारात उतरले आहेत.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : राजकारणात नवा ट्विस्ट! ठाकरेंच्या शिवसेना बैठकीनंतर भास्कर जाधवांचा मोर्चा भाजप नेत्याकडे वळाला, रत्नागिरीत खळबळ

याबाबत त्यांनीच माहिती दिली असून आमच्या पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरल्याचे कळाले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं म्हणून मी चिपळूणच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील चर्चेत राष्ट्रवादीसोबत जागांच्या वाटाघाटीचा तिढा सोडवून घेतला आहे. मात्र मी येथे नसताना अचानक चर्चा थांबवल्या. याचे कारण मला अद्याप कळू शकलेले नाही.

तर मी रमेश कदम यांनी शब्द दिला असून परिणामांची चिंता न करता मी कदम यांचा प्रचार करणार असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळं आता विनायक राऊत यांच्या आदेशानुसार चिपळूनमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यांच्याविरोधातच भास्कर जाधव प्रचारात दिसण्याची शक्यता आहे.

तळवडे गाव चर्चेत

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील तळवडे या गावाने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांसमोर एक अनोखी मागणी ठेवली आहे. सध्या ही मागणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीसाठी गावात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

तळवडे या गावाने नेटवर्कच्या मूलभूत सुविधेसाठी थेट मतदानाचा संबंध जोडला आहे. यावेळी गावात सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली आहे. गावात फुकट फिरू नका, नेट द्या… मत घ्या!, नेट दिलात तरच वोट…, अशा आशयाचे अनेक बॅनर सध्या गावात झळकत आहेत. आज 5G च्या जमान्यातही तळवडे गाव मोबाईल नेटवर्कपासून पूर्णपणे वंचित आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखी शक्कल लढवली आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : मुलावर टीका होताच भास्कर जाधवांचा संताप! “ज्यांचा नेता बाया नाचवून पैसे कमावतो…” म्हणत रामदास कदम आणि योगेश कदमांवर हल्लाबोल!

FAQs :

1. भास्कर जाधव का नाराज आहेत?

चिपळूणमधील शिवसेनेतील अंतर्गत कलह, विशेषतः विनायक राऊत यांच्यासोबतचा विसंवाद, हा नाराजीचा प्रमुख कारण आहे.

2. ते कोणाचा प्रचार करणार आहेत?

ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.

3. शिवसेनेत फूट पडल्याचं कारण काय?

जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील विसंवादामुळे स्थानिक पातळीवर पक्षात तणाव आणि फूट निर्माण झाल्याचे दिसत आहे.

4. याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?

शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी होऊन राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे.

5. हा विवाद सोडवण्याची कोणती हालचाल झाली आहे का?

सध्या कोणतीही अधिकृत सामंजस्याची चर्चा समोर आलेली नाही; परिस्थिती ताणलेलीच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com