Vaibhav Naik : ‘सिध्देश’ आमचा कार्यकर्ता नव्हताच, पण त्याचा ‘आका’ कोण हे लवकरच कळेल; राणेंचे आरोपांवर ठाकरेंचा शिलेदार भिडला

Vaibhav Naik on Nilesh Rane : येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या तरुणाच्या हत्येचा दोन वर्षांनंतर उलगडा झाला असून कोकणात दोन शिवसेना आमने-सामने आल्या आहेत.
Vaibhav Naik, Nilesh Rane
Vaibhav Naik, Nilesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे शांत असणारा कोकण अस्वस्थ झाला आहे. येथे दोन शिवसेना आमने-सामने आल्या असून ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार नीलेश राणेंवर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांवर पलटवार करताना नीलेश राणेंनी कोकणाला बदनाम करू नका म्हणत या प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट ठाकरे गटाचा कार्यकर्ता होता असा दावा करताना काही आरोप केले होते. हे आरोप वैभव नाईक यांनी फेटाळले असून तो आमचा कार्यकर्ता नव्हताच असे म्हटले आहे. तर त्याचा ‘आका’ कोण हे लवकरच कळेल, असाही इशारा दिला आहे.

येथील ठाकरे शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषदेत घेऊन नाईक यांनी नीलेश राणे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट व गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. येथे शिंदे गटामधील दोन गटात असलेल्या अंतर्गत वादामुळेच हे हत्याप्रकरण प्रकाश झोतात आले आणि त्याचा उलगडा झाल्याचा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच संशयित सिद्धेश शिरसाट हा आमचा कार्यकर्ता नव्हता किंवा तो दहा वर्षांत कधीही शाखेत आला नाही. माझ्यासोबत त्याचा कधीही त्याचा वावर नव्हता किंवा माझ्यासोबत त्याचा एकही फोटो नसल्याचा दावाही वैभव नाईक यांनी केला आहे.

Vaibhav Naik, Nilesh Rane
Vaibhav Naik-Yogesh Kadam : बीड पॅटर्नने सिंधुदुर्ग हादरला, बिडवलकर हत्याप्रकरणावर वैभव नाईकांचा गंभीर आरोप; कदमांचंही प्रत्युत्तर

तर तो शिवसेनेत कधीच सक्रियही नव्हता. खुनाच्या घटनेनंतर तो सक्रिय झाला. गेल्या दीड वर्षांत आमदार नीलेश राणेंसोबत त्याचा वावर होता. मग त्याला पाठीशी घालणारा ‘आका’ कोण? हे आता लवकरच जगासमोर येईल असा इशारा वैभव नाईक यांनी नीलेश राणे यांनी केलेले आरोप फेटाळून लावताना दिला आहे.

तर नीलेश राणे यांनी केलेल्या नाईक यांच्यावरील आरोपवार त्यांनी निशाना साधला असून, आम्ही जिल्ह्याची किंवा कोणतीही बदनामी केलेली नाही. बिडवलकरच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळवा, हीच आपली भूमिका आहे. जिल्ह्यात कोणाची दहशत आहे आणि कोणामुळे बदनामी होतेय, हे जिल्हावासीयांना आणि राज्याला माहिती आहे. मी गेल्या काही दिवसांत आमदार नीलेश राणेंवर टीका केलेली नव्हती. पण माझा पराभवाचा मुद्द्या त्यांनी उपस्थित करून कोणाची कोणी बदनामी केली?

मी माझा पराभव स्वीकारून जनतेसाठी काम सुरू केले आहे. पण या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा पराक्रमक आता कोण करतय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहीजे. त्यासाठी आम्ही आवाज उठवला आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत तर आमदार राणे यांनी दोन वर्षांपूर्वीच्या घटनांच्या फाईल्स का तपासता, असा प्रश्न पोलिस अधीक्षकांना केला होता.

शिंदे गटामधील अंतर्गत वादामुळेच हे खून प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. याची ज्यांना माहिती होती आणि हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला, तेही यात तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही पालकमंत्री आणि पोलिस अधीक्षकांनी कारवाई करावी, अशी आमची आपली मागणी असल्याचेही नाईक म्हणाले.

Vaibhav Naik, Nilesh Rane
Vaibhav Naik : 'ठाकरेंनी कोकणाला काय दिलं?', वैभव नाईकांनी कोंबड्या परिचीत नेता म्हणत, राणेंना आव्हानचं दिलं

...दहशत त्यांच्या वडिलांना माहीत आहे

तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर बोलताना नाईक म्हणाले की, योगेश कदम अलिकडेच राजकारणात आले आहेत. राणेंची दहशत काय आहे? हे त्यांच्या वडिलांना माहीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com