

Ratnagiri News : यंदा राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी व अनियमित राहिल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात तर भात आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना फक्त तीन तालुकेच राज्य सरकारने ट्रिगर-1 मध्ये घेतले आहेत. यावरून आता टीका होताना दिसत असून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत उर्वरीत आक्रमक भूमिका घेतली होती. या पत्राची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली होती.
दरम्यान आता त्यांनी Gen-Z ला केलेल्या आवाहनाची चर्चा होताना दिसत आहे. भास्कर जाधव यांनी SIR विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली असून ते ७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी लोकशाही आणि संविधानावर विश्वास असलेल्या Gen-Z तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील भात आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही तीन तालुक्यांचा समावेश करत गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड आणि लांजा या सहा तालुके वगळण्यात आले. यावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र धाडले होते. तसेच वगळण्यात आलेल्या या सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. अद्याप यावर सरकारकडून निर्णय झालेला नाही.
तोच आता भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आक्रमकपणे आवाज उठवला आहे. राज्य सरकारच्या SIR धोरणाविरोधात महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 07 ऑक्टोबरला चिपळूणमध्ये भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला बहादूर शेख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. तर इंदिरा गाँधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यापासून या मोर्च्यांला सुरूवात होईल.
याबाबत नुकताच भास्कर जाधव यांच्या कार्यालयात आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. ज्यात मोर्चाच्या नियोजनावर चर्चा झाली. यावेळी या लढ्यात ‘Gen-Z’ने सहभागी होत नव्या पिढीने रस्त्यावर उतरावे असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.
भास्कर जाधव यांनी, ज्या प्रकारे दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये ‘Gen-Z’ने लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन केले. तसेच आता ज्यांचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास आहे त्यांनी येथील आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करताना हे आंदोलन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी असेल असे स्पष्ट केले आहे.
कारकीर्दच वादग्रस्त
मुख्य निवडणुक अधिकारी आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पार्टीचे काम करत असून त्यांची कारकीर्दच वादग्रस्त ठरल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.