Bhaskar Jadhav : उदय सामंतांच्या टीकेला भास्कर जाधवांचे थेट प्रत्युत्तर, दुष्काळावरून घेरलं; 'आपली पापं झाकली जाणार नाहीत’

Bhaskar Jadhav on Uday Samant : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नुकताच मराठवाड्याचा दौरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केला.
Ratnagiri Drought Controversy; Bhaskar Jadhav And Uday Samant
Ratnagiri Drought Controversy; Bhaskar Jadhav And Uday Samantsarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : राज्यात तीव्र दुष्काळीची शक्यता असून अनेक ठिकाणी पाऊस न झाल्याने पीकं वाळून गेली आहे. जनावरांच्या चारा -पाण्याचेही गडद संकट आहे. यावरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाना साधला होता. ज्याला उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना सामंत यांनी, 'ते आता घरातून आता बाहेर पडलेत, त्यांचे अभिनंदन', असे म्हणाले होते. या टीकेला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील दुष्काळाच्या नुकताच राज्य सरकारने ट्रिगर-१ लागू करत 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. तसेच ‘ट्रिगर-२’ मध्ये जे तालुके वगळ्यात आले असे ४३ तालुके दुष्काळी यादीत समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिला आहे.

दरम्यान आता कोकणासह राज्यभरातील जे तालुके भीषण संकट असतानाही वगळण्यात आले यावरून वाद सुरू झाला आहे. याच मुद्द्यावरून ठाकरेंवर टीका करणाऱ्या उदय सामंत यांना भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठकीनंतर पत्रकार परीषद घेत चांगलेच झापतं टीका केली आहे.

Ratnagiri Drought Controversy; Bhaskar Jadhav And Uday Samant
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा सरकारवर संताप; बैठकीचा मुद्दा सांगत चांगलेच भडकले

यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, ठाकरे घराबाहेर पडले अशी दर एक दोन दिवसांनी एकदा बातमी लागलेली असते. याचा अर्थ ठाकरे घराबाहेर पडतात. पण सत्ताधाऱ्यांना दुसरं तुणतुणं नाही ते ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत असं वाजवतात. मात्र या बाजार भूनगे, उडाणटप्पूंना शेतकऱ्यांचे दुःख कळणार नाही, असा टोला लगावला आहे.

तसेच मी गुहागरचा विरोध पक्षाचा आमदार आहे, येथे सगळी शेती सुकली हे त्यांना दिसत नाही. पण यांचे ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत असे तुणतुणे कायम आहे. यामुळे सामंत यांनी ठाकरेंना बोलण्यापेक्षा आपल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी.

Ratnagiri Drought Controversy; Bhaskar Jadhav And Uday Samant
Bhaskar Jadhav : 'महाजन- गोगावलेंना पालकमंत्रीपद का दिलं? भास्कर जाधवांनी कारणचं सांगितलं

जिल्ह्यातील फक्त तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून यादीत आले आहेत. याबाबत ते मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहेत का? यामुळे ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत, अशी देखील जोरदार टीका भास्कर जाधवांनी उदय सामंत यांच्यावर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com