Vaibhav Naik : सिंधुदुर्गची अवस्था बीडच्या दिशेने? वैभव नाईकांचा राणे समर्थकांवर हल्लाबोल; दाम्पत्याला मारहाण आणि महिलेचा विनयभंगाचा दावा

Vaibhav Naik Facebook Post : सावडाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणाऱ्या सावंत दाम्पत्याला मारहाण आणि महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
Vaibhav Naik
Vaibhav Naiksarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्गमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या बिडवलकर हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वाद रंगला आहे. येथे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे आणि ठाकरे गटातील नेते माजी आमदार वैभव नाईक यांच्यात कलगितूरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता वैभव नाईक यांनी नवा विषय घेत राणे समर्थकांवर मोठा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी फेसबूकवर पोस्ट करत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग याची दखल घेणार का? असा सवाल केल्याने वाद उफाळण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या बिडवलकर हत्या प्रकरणावरून नुकताच वैभव नाईक यांनी राणेंवर तोफ डागताना मुख्य आरोपीचा आका कोण असा सवाल उपस्थित केला होता. यावरून सध्या सुरू झालेल्या वाद अद्याप शांत झालेल्या नसतानाच आता कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायतीवरून झालेल्या मारहाणीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत फेसबूकवर एक पोस्ट करताना, वैभव नाईक यांनी, सावडाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणाऱ्या सावंत दाम्पत्याला मारहाण झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते नयना सावंत व वैभव सावंत यांनी हा आरोप केल्याने त्यांना भाजपचे माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच आणि राणेसमर्थक दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Vaibhav Naik
Vaibhav Naik : ‘सिध्देश’ आमचा कार्यकर्ता नव्हताच, पण त्याचा ‘आका’ कोण हे लवकरच कळेल; राणेंचे आरोपांवर ठाकरेंचा शिलेदार भिडला

अमानुषपणे मारहाण करताना या लोकांनी नयना सावंत यांच्या अंगावरील जॅकेट जबरदस्तीने ओढत जॅकेटच्या आत असलेले टी-शर्ट फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच नयना सावंत यांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील वक्तव्ये, शिवीगाळ आणि धमकी भाजपच्या दत्ताराम काटे यांनी दिल्याचा दावा केला आहे. हा प्रकार नयना सावंत यांच्या विनयभंगाचा असून त्यांना मारहाण देखील झाली आहे. धक्कादायक म्हणजे वैभव सावंत यांच्या गुप्तांगावर धारधार शस्त्राने जखमदेखील करण्यात आली. या अमानुषपणे मारहाणीमुळे नयना सावंत व वैभव सावंत यांच्यावर ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नयना सावंत आणि वैभव सावंत यांना झालेल्या जबर मारहाणीवर पोलिसांनी योग्य ती कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडच्या दिशेने वाटचाल होत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणात कणकवली पोलिसांनी दत्ताराम काटे आणि इतर सात जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Vaibhav Naik
Vaibhav Naik-Yogesh Kadam : बीड पॅटर्नने सिंधुदुर्ग हादरला, बिडवलकर हत्याप्रकरणावर वैभव नाईकांचा गंभीर आरोप; कदमांचंही प्रत्युत्तर

यावरून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष मारहाण झाली असून नयना सावंत यांचा विनयभंग झाला आहे. यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. सत्तेत आल्यामुळे राणे समर्थकांची पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत सुरू झाली आहे. याची दखल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग घेणार का? असाही सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित करताना राणें यांच्यावर निशाना साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com