FDA Action : तुकाराम मुंढेंच्या जोडीला आता पालकमंत्र्यांच्याही ताकद : FDA च्या कारवाईचे समर्थन करत नितेश राणेंचा व्यावसायिकांना इशारा

FDA Action In Sindhudurg : अन्न व औषध प्रशासन विभागाने तळकोकणात मोठी कारवाई करत गुटखा विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. चार महिन्यात केलेल्या कारवाईत तब्बल 22 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
FDA Action In Sindhudurg
FDA Action In Sindhudurgsarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी ८२ तपासण्या करून ४७ नमुने घेतले. यामध्ये १९ सुधारणा नोटिसा व १२ व्यवसायांना बंद नोटिसा बजावण्यात आल्या. कारवाईतून एक लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच गुटखा विक्रीविरोधात सहा कारवाया करून २२ लाख २४ हजार ९६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, विभागाकडे प्राप्त झालेल्या ३३ तक्रारींपैकी ३० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे, ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असून, व्यवसायिकांनी प्रशासनाच्या तपासणी व कार्यवाहीस आवश्यक ते सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्या व कारवाया या संबंधित कायदे, नियम आणि निर्धारित प्रक्रियेनुसारच करण्यात येत आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६, तसेच त्याअंतर्गत केलेले नियम व विनियमांच्या आधारे अन्न व्यवसायांची तपासणी, नमुने घेणे, आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही आदी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने कारवाईबाबत गैरसमज न ठेवता आपल्या आस्थापनेतील त्रुटी दूर करून नियमांचे पालन करण्यास प्राधान्य द्यावे.

FDA Action In Sindhudurg
Amazon Bhiwandi FDA action : ‘डास मारण्यासाठी तलवार...’; ॲमेझॉन प्रकरणात FDAच्या कारवाईवर हायकोर्ट नाराज! म्हणाले, ‘प्रत्येक आस्थापना बंद करणार का?’

व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी

हॉटेल व खाद्य व्यवसायिकांनी आपल्या आस्थापनेचा एफएसएसएआय परवाना/नोंदणी वैध असल्याची खात्री करून त्याचा क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करावा. एफएसएसएआयच्या नियमानुसार खाद्य व्यवसायासाठी परवाना/नोंदणी आवश्यक आहे. स्वयंपाकघर, अन्न साठवणूक जागा, भांडी, उपकरणे आणि परिसराची नियमित स्वच्छता ठेवावी. कच्चे व शिजविलेले अन्न स्वतंत्रपणे ठेवावे. अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.

तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी. दूषित, खराब किंवा मुदतबाह्य कच्चा माल अथवा अन्नपदार्थ वापरू नयेत. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी योग्य तापमान व स्वच्छ साठवणूक पद्धतीचा अवलंब करावा. खाद्य व्यवसायिकांनी अन्नपदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी विश्वसनीय स्रोतांकडून करावी आणि आवश्यक खरेदी, नोंदी, बिल तसेच संबंधित कागदपत्रे व्यवस्थित जतन करावीत. अन्न व्यवसायातील स्वच्छता व सुरक्षिततेसाठी एफएसएसएआयच्या शेड्यूल ४ मधील स्वच्छता व आरोग्यविषयक आवश्यकतांचे पालन करणे अपेक्षित आहे.

निजिल्ह्यातील सर्व खाद्य व्यावसायिकांनी तपासणी होण्याची वाट न पाहता स्वतःच्या आस्थापनेची नियमित तपासणी करावी. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नसुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे स्वेच्छेने पालन करावे.

- ललित गायकवाड, सहायक आयुक्त

FDA Action In Sindhudurg
​FDA Action : पुण्यात FDA चा ‘सर्जिकल स्ट्राईक! तडकाफडकी बंद केली 'ही' 21 हॉटेल्स!

व्यावसायिकांनी घाबरू नये

राणे पालकमंत्री राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जिल्ह्यातील हॉटेल आणि खाद्य व्यवसायांना विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांनी घाबरण्याचे कारण नाही; मात्र नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कायद्यानुसार कार्यवाही होणे अपरिहार्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com