Woman Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता महिला हवालदाराचा मृतदेह जंगलात आढळला; सिंधुदुर्ग पोलिसांत खळबळ

Sindhudurg woman police constable Smita Mane found dead Bidwadi-Humbarne forest area. Police investigating circumstances surrounding her death : कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे परिसरात आढळला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Woman Police Constable Smita Mane Death
Woman Police Constable Smita Mane DeathSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kankavli police news : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कणकवली पोलिस ठाण्याच्या महिला हवालदार स्मिता सचिन माने यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. स्मिता यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकलेले नाही.

मात्र, या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पती सचिन माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

स्मिता माने या 18 वर्षांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) पोलिस दलात कार्यरत होत्या. सध्या त्या कणकवली पोलिस ठाणे येथे हवालदार पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती सचिन माने हे देखील कणकवली पोलिस ठाणे येथे कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.

या दोघांची नुकतीच वैभववाडी पोलिस (Police) ठाणे येथे बदली झाली होती. त्यासाठीच दोघांनी 8 व 9 ऑक्टोबरला सुट्टी घेतली होती. दरम्यान, कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असताना, दोघे वास्तव्य कलमठ-नाडकर्णीनगर येथे होते. गुरुवारी 8 ऑक्टोबरला वैभववाडी येथे नेण्यासाठीचे सामानाची आवराआवर करून ठेवली होती.

Woman Police Constable Smita Mane Death
Mumbai Shivaji Park Police Action : पोलिसांच्या गफलतीनं आंदोलनात गंमतीजमती? साध्या वेशातील कर्मचाऱ्यासह बघ्यांना, केटरिंग व्यावसायिकाला घेतलं ताब्यात

शुक्रवारी सकाळी 7 वाजता सचिन यांनी पाहिले, तेव्हा स्मिता मुलगा सार्थक याची शाळेची तयारी करत होत्या. त्यानंतर सचिन तासभर हॉलमध्ये झोपले होते. मात्र, उठल्यानंतर पाहिले असता स्मिता घरात नव्हत्या. सचिन यांनी स्मिता यांचा आजूबाजूला शोध घेतला. मुलगा सार्थक हा शिकत असलेल्या शाळेतही चौकशी केली. मात्र, स्मिता कुठेच आढळून आल्या नाही.

Woman Police Constable Smita Mane Death
Ahilyanagar DCC Bank Election : ‘एका शब्दाला दहा शब्दांचा मान’; विखेंची आमदार लहामटेंना साद

जिल्हा पोलिस दलात खळबळ

अखेरीस सचिन यांनी पत्नी स्मिता बेपत्ता झाल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दिली. तक्रार दाखल झाल्यापासून पोलिसांतर्फे स्मिता यांचा शोध सुरू होता. रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय भागात काही ग्रामस्थांना एक मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. याबाबतची माहिती मिळताच कणकवली पोलिस हुंबरणे परिसरात दाखल झाले. पाहणी केली असता मृतदेह स्मिता यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली. स्मिता यांच्या मृत्यूचे वृत्त समोर येताच, नातेवाईकांना देखील धक्का बसला.

वरिष्ठ पोलिसांकडून तपास सुरू

स्मिता या 2008 साली सिंधुदुर्ग पोलिस दलात रूजू झाल्या होत्या. गेल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कणकवलीसह कुडाळ, दोडामार्ग आदी पोलिस ठाण्यांमध्ये सेवा बजावली होती. कणकवली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, स्मिता यांनी हे पाऊल कोणत्या प्रकारातून उचलले, याचा तपास सुरू केला आहे.

पोलिस कर्मचारी पतीविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, स्मिता माने यांची बहीण रेश्मा रवींद्र जाधव (रा. हुंबरठ) यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन माने यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पट्ट्याने मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर स्मिता यांच्या मृत्यूस पती जबाबदार असू शकतो किंवा त्यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे सचिन माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपांची सत्यता अद्याप तपासातून स्पष्ट व्हायची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com