kokan Politics : तडीपारीच्या कारवाईने कोकणात राजकारण पेटले; शिंदेंच्या शिवसेनेतून हाकालपट्टी केलेल्या नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा

parshuram kadam alleges Over tadipari action On munna desai : जिल्हा परिषद निवडणुकीत हातखंबा गटातून झालेल्या जोरदार राजकीय घडामोडीनंतर केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.
shivsena crisis; uday samant And munna desai
shivsena crisis; uday samant And munna desaisarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दक्षिण रत्नागिरीतील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

  2. परशुराम कदम यांच्या समर्थक केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

  3. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून असल्याचा आरोप करत कदम यांनी प्रशासनाने कारवाई न थांबवल्यास रस्तारोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ratnagiri zp election politics News : नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दक्षिण रत्नागिरीतील राजकारण आणखीनच तापले आहे. शिवसेना नेते परशुराम कदम यांची हाकालपट्टी केल्यानंतर केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी राजीनामा दिला तसेच अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचा प्रचार केला होता. याचे पडसाद आता निकालानंतर उमटत असून मुन्ना देसाई यांच्यावर नुकताच तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर आता येथील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, स्थानिक पातळीवर संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. कदम यांनी या कारवाया राजकीय सूडबुद्धीतून केल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या कारवाया तात्काळ प्रशासनाने थांबवल्या नाहीत तर ग्रामस्थ आणि समर्थकांकडून ‘रास्तारोको’ आंदोलन छेडले जाईल. असाही इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, स्थानिक पातळीवर संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवायांवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

shivsena crisis; uday samant And munna desai
Uday Samant : सत्तेची चाहूल लागताच बदलली भूमिका? कोकणात उदय सामंतांमुळे नव्या समीकरणांची चर्चा!

या कारवाया राजकीय सूडबुद्धीतून केल्या जात असल्याचा आरोप आता होताना दिसत आहे. याबाबत माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी गंभीर आरोप करत प्रशासनास थेट इशारा दिला आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीदरम्यान मुन्ना देसाई यांनी सत्ताधाऱ्याच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार कदम यांचा प्रचार केला होता.

आता हा प्रचारच त्याच्या अंगलट आल्याचे दिसत असून प्रशासनाने जुन्या प्रकरणांची चौकशी व प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्याचा दावा कदम यांनी केला आहे. तसेच कदम यांनी पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून अशा कारवाई करत असल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे.

तसेच कोकणातील शिमगोत्सव (होळी) जवळ येत असतानाच सणासुदीच्या काळात अशी कारवाई तरुण कार्यकर्त्यांवर करणे योग्य नसल्याचे म्हणत थेट प्रशासनास इशारा दिला आहे. कदम यांनी, तात्काळ प्रशासनाने या कारवाया थांबवाव्यात अन्यथा ग्रामस्थ आणि समर्थकांकडून ‘रास्तारोको’ आंदोलनल केले जाईल असे म्हटले आहे.

दरम्यान, कदम यांच्या दावे, आरोप आणि इशाऱ्यानंतर प्रशासन किंवा संबंधित सत्ताधाऱ्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पण सध्या हातखंब्यात सुरू असणारे राजकारण आणि घडामोडींमुळे पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधातच जनमत जाण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे.

shivsena crisis; uday samant And munna desai
Ambadas Danve On Uday Samant: चर्चा होतातच, मी शिवसैनिकच; माझ्याकडे पक्षाने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्यात! मंत्री सामंत यांचा दावा अंबादास दानवेंनी फेटाळला

FAQs :

1. दक्षिण रत्नागिरीत वाद कशामुळे निर्माण झाला?
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मुन्ना देसाई यांच्यावर झालेल्या तडीपारी कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

2. मुन्ना देसाई यांच्यावर कोणती कारवाई झाली?
त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

3. परशुराम कदम यांनी काय आरोप केले?
ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याचा गंभीर आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.

4. रस्तारोको आंदोलनाचा इशारा का देण्यात आला?
कारवाई तात्काळ थांबवली नाही तर ग्रामस्थ आणि समर्थकांकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

5. पुढे परिस्थिती कशी राहू शकते?
प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमधील चर्चेनंतर परिस्थिती स्पष्ट होऊ शकते; अन्यथा आंदोलनाची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com