Kokan Politics : ‘माझी कामे अडवली, तर थेट...’; तटकरेंचा रत्नागिरी 'डीपीडीसी' बैठकीतच पारा चढला, सामंतांना करावी लागली मध्यस्थी

Sunil Tatkare And Uday Samant Politics : नुकताच रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर पालकमंत्री उदय सामंत आणि भाजप नेते तथा खासदार नारायण राणे हे एकाच गाडीतून प्रवास केला.
Ratnagiri District Planning Committee meeting
Ratnagiri District Planning Committee meetingsarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर एकीकडे खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्यातील अबोल्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तोच इतर नेत्यांनी तटकरेंशी जुळवून घेतल्याचेही चित्र आहे. दरम्यान आता या बैठकीतील नवा वाद समोर आला असून पालकमंत्री उदय सामंत आणि तटकरे आमनेसामने आले. तर तटकरे यांनी विकासकामांवरून आक्रमक भूमिका घेत थेट हक्कभंगच आणू असा इशारा दिला आहे. यामुळे एकीकडे सगळं अलबेल आहे असे असणारे चित्र मात्र धुसफूसीचेच असल्याचेही बोलले जात आहे.

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी विकासकामांवरून आक्रमक भूमिका घेतली. मंजुरी मिळालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप करत ‘माझी कामे अडवली तर थेट हक्कभंग आणू, ’ असा सज्जड इशारा दिला. पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत आठ दिवसांत सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्याचे आश्वस्त केल्यानंतर वाद शांत झाला.

माझा कोणावर रोष नाही; परंतु ज्याने हे पाप केले त्याला ते लखलाभ असो, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बाबाजी जाधव, बशिर मुर्तुझा, बंटी वणजू, बिरवटकर आदी उपस्थित होते. निधी वाटपावरून सत्ताधारी महायुतीत पडलेली ठिणगी आणि बैठकीत दोन बड्या नेत्यांमध्ये एकमेकांना कोंडीत पकडण्याचा झालेला प्रयत्न यामुळे नियोजन समितीची बैठक चर्चेत आली.

Ratnagiri District Planning Committee meeting
Ratnagiri DCC Bank Election : उदय सामंत रत्नागिरी जिल्हा बँकेच्या आखाड्यात; भाऊ आमदार किरण सामंतांकडूनही मोर्चेबांधणी

विकासकामांच्या मंजुरीवरून खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री योगेश कदम अप्रत्यक्षरीत्या आमने-सामने आल्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अखेर पालकमंत्री सामंत यांनी मध्यस्थी करत आठ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने ही राजकीय शाब्दिक चकमक तात्पुरती थांबली. बैठकीची सुरुवातच मुळात एका मोठ्या राजकीय नाट्याने झाली.

खासदार तटकरे यांनी जिल्हा नियोजन समितीत सुचविलेल्या काही महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी मिळत नसल्याचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. कामे रखडण्यामागे काय राजकारण आहे, मंजुरी का दिली जात नाही, असा सवाल करत नाराजी व्यक्त केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमधील हा हाय व्होल्टेज वाद वाढताना पाहून अध्यक्षस्थानी असलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप केला. या वादावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आठ दिवसांत सर्व संबंधितांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

Ratnagiri District Planning Committee meeting
Ratnagiri DPDC : योगेश कदमांच्या समर्थकांना डावलत रत्नागिरी DPDC वर उदय सामंतांचा वरचष्मा, भाजप-राष्ट्रवादीला स्थान देत 'सेफ गेम'

बाक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी आवश्यक

नाणार येथे प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाविषयी होणाऱ्या जनसुनावणीविषयी खासदार नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘या प्रकल्पाविषयीची जनसुनावणी रद्द करणे योग्य नाही. यामधून लोकांचा आवाज दाबून टाकला जात आहे. सुनावणीतून लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायचे असते.’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com