Raigad Politics : गोगावले, थोरवे, दळवी अन् अख्ख्या शिवसेनेपासून सुटका मिळणार? तटकरेंकडून रायगडच्या विभाजनाचा नवा डाव चर्चेत

Sunil Tatkare Raigad District Division Proposal : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या विभाजनाबाबत भाष्य केलं आहे.
Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या विभाजनाबाबत केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा अस्तित्वात आल्यास त्याचे मुख्यालय माणगाव येथे करण्याचा शब्द सुनील तटकरे यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा विभाजनाच्या मागणीला पुन्हा चालना मिळाली आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील सध्याचा संघर्ष पाहता, या प्रस्तावाकडे केवळ प्रशासकीय सोयीचा विषय म्हणून नव्हे, तर संभाव्य राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

गोगावले, थोरवे, दळवींच्या राजकीय प्रभावाला पर्याय?

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांचे स्वतंत्र राजकीय प्रभावक्षेत्र आहे. दुसरीकडे, सुनील तटकरे आणि त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेसही जिल्ह्यात आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही पक्ष महायुतीमध्ये एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धा आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून त्यांच्यातील मतभेद वारंवार समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुढे आणल्याने त्यामागे राजकीय रणनीती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यास प्रशासकीय केंद्रे, स्थानिक नेतृत्व आणि जिल्हास्तरीय राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो.

Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Raigad Politics : रायगडात अवघ्या आठवडाभरातच राजकीय चित्र बदलले; राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! शिवसेनेसह अन्य पक्षांना धक्का

माणगावच्या मुख्यालयाचा शब्द; तटकरेंची नवी खेळी?

रायगड जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माणगावला संभाव्य नवीन जिल्ह्याचे मुख्यालय करण्याची मागणीही यापूर्वी करण्यात आली आहे. आता सुनील तटकरे यांनी या मागणीला पुन्हा उजाळा दिला आहे. रोहा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी भविष्यात नवीन जिल्हा निर्माण झाल्यास त्याचे मुख्यालय माणगाव येथे करण्याचा शब्द दिला.

त्यामुळे माणगावसह परिसरातील राजकीय आणि प्रशासकीय अपेक्षांना पुन्हा चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात शिवसेनेसोबत सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या काळातच तटकरे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावातून राष्ट्रवादीला स्वतंत्र राजकीय अवकाश निर्माण करण्याची संधी मिळू शकते का, याबाबत चर्चा होत आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीत पक्षप्रवेशांवरून संघर्ष

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष नवीन नाही. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये राजकीय वर्चस्वावरून मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांच्या राजकीय भूमिकांमुळेही महायुतीतील स्थानिक समीकरणांकडे लक्ष वेधले गेले आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. माणगाव परिसरातील पक्षप्रवेशांमुळे हा संघर्ष अधिक चर्चेत आला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बैठका आणि नव्या नियुक्त्यांवर भर दिला जात आहे.

Raigad Shivsena NCP Political Conflict; Bharat Gogawale, Mahendra Thorve, Mahendra Dalvi And Sunil Tatkare
Raigad Politics : ‘एकेकाळचा सत्तेतील शेकाप आज संपला; कुरघोडी राष्ट्रवादीची मैत्री लांब ठेवा' : विकास गोगावलेंचा शिवसेनेला सूचक इशारा

रोह्यातील बैठकीत तटकरेंनी दिले संकेत

रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. याच बैठकीत तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या संभाव्य विभाजनाबाबत भूमिका मांडली. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय माणगाव येथे करण्याचा शब्द दिल्याने या जुन्या मागणीला पुन्हा राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.