Raigad News: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; शिंदे गटातील आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

Vikas Gogawale News: अनिल नवगणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला आहे. यात नवगणे यांना दुखापत झाली नाही, पण त्यांच्या गाडीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते.
Vikas Gogawale
Vikas GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर (Anil Navgane) यांच्यावर बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. हा हल्ला शिंदे गटाकडून करण्यात आल्याची आरोप होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा हल्ला झाल्याने रायगडमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

Vikas Gogawale
Congress News: अखेर ठरलं; राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार, अमेठीतून केएल शर्मा मैदानात

अनिल नवगणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला आहे. यात नवगणे यांना दुखापत झाली नाही, पण त्यांच्या गाडीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. या हल्ल्याच्या वेळी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे उपस्थित होते, असा आरोप अनिल नवगणे यांनी केला आहे. विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (गुरुवारी) महाड येथे महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेमध्ये ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आपल्या भाषणात आमदार गोगावले पित्रापुत्रावर जोरदार टीका केली.

सभा संपल्यानंतर नवगणे आपल्या घरी रवाना होत असताना मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञान व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हा प्रकार रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. नवगणे यांच्या गाडीवर हल्ला करुन हल्लेखोरांनी अंधारातून पळ काढला. हल्ल्यात नवगुणे यांना दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.

Vikas Gogawale
Crime News : 'अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही!', 'त्या' व्हिडिओने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Police investigate a violent extortion-related attack at a scrap shop in Turbhe, Navi Mumbai, where a worker was critically injured after alleged ransom demands were refused.
Pune Crime News
Family attacked with iron rod in Nashik
Maharashtra Politics Live Update
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com