Employee Murder : समलैंगिक छळाच्या आरोपानंतर वरिष्ठाची हत्या; मृतदेहाचे गूढ अन् ठाणे हादरले, दोघांना अटक

Two colleagues arrested for allegedly murdering senior over alleged harassment : मामणोली जंगलात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; पोलिस तपासात कंपनीतील दोन सहकाऱ्यांना अटक, न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली
Employee Murder
Employee MurderSarkarnama
Published on
Updated on

Thane Crime News : कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील मामणोली जंगलात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ ठाणे ग्रामीण पोलिसांनी उकलल्याचा दावा केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कंपनीतील वरिष्ठाकडून होत असलेल्या कथित समलैंगिक छळाला कंटाळून दोन सहकाऱ्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील मामणोली गावाजवळील जंगलात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ ठाणे ग्रामीण पोलिसांनी (Police) उकलल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी किशोरचंद्र कार्तिक साहू (42) यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कंपनीतील दोन सहकारी सौरभ विश्वनाथ गाल्हे (24) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय कंठे (28) यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली.

मागील महिन्यात मामणोली गावाजवळील जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे (Thane) ग्रामीण पोलिसांनी (Police) सहा स्वतंत्र तपास पथके तयार करून तपास सुरू केला.

Employee Murder
Rape Accused Escape : अत्याचारातील संशयिताला पोलिस ठाण्यात आणला, चप्पल हातात घातली अन् पसार झाला; 'पोलिसांचीच मदत' नातेवाईकांना संशय

दरम्यान, मृताच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मृतदेहावरील शर्टवरील कंपनीच्या चिन्हावरून मृताची ओळख पटली. त्यानंतर संबंधित कंपनीत चौकशी करण्यात आली आणि दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

Employee Murder
Anganwadi Worker Kidnap : लिफ्टच्या बहाण्याने अंगणवाडी सेविकेचे अपहरण; दिवसभर ओलीस ठेवून मारहाण, 96 हजारांची लूट

वरिष्ठ म्हणून सहाकाऱ्यांवर समलैंगिक संबंधांसाठी दबाव

चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची माहिती दिली असल्यचा दावा पोलिसांनी केला आहे. किशोरचंद्र साहू हे संबंधित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. वरिष्ठ पदाचा गैरफायदा घेत ते दोन सहकाऱ्यांवर समलैंगिक संबंधांसाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. या कथित छळाला कंटाळून दोघांनी साहू यांना मामणोली जंगलात नेऊन धारदार शस्त्राने हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मृताच्या अंगावरील दागिने काढून घेतले

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर मृताच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही आरोपींनी काढून घेतले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com