Mumbai Goa Highway: राज ठाकरेंनी पाठ फिरवताच मनसैनिकांनी फोडले मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीचे ऑफिस

Raj Thackeray Panvel News : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेत या महामार्गाची पाहणी केली.
Raj Thackeray Panvel News
Raj Thackeray Panvel NewsSarkarnama
Published on
Updated on

Panvel News: तेरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेत या महामार्गाची पाहणी केली. मात्र, राज ठाकरे या मेळाव्यावरुन परतत नाही तोच मनसैनिकांनी या महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या ऑफिसची तोडफोड केली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या आणि फर्निचरची तोडफोड करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर त्या कंपनीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Panvel News
India Alliance News: 'इंडिया आघाडी'वर केजरीवाल नाराज? मुंबईतील बैठकीला 'आप' अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा

राज ठाकरे यांनी 'निर्धार' मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त केली. "एकीकडे भारताचे यान चंद्रावर जाते, पण दुसरीकडे रस्ते चांगले मिळत नाहीत", अशा शब्दात टीका करत राज्यातील रस्त्यांच्या दुराव्यस्थेवर भाष्य केले.

या महामार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये महागार्गावर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगत सरकारचे लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

Raj Thackeray Panvel News
Sharad Pawar News : 'शिवसेनेच्या चिन्हाबाबत केंद्रातील शक्तिशाली घटकांनी हस्तक्षेप केला'; पवारांचा इशारा कुणाकडे ?

पनवेलमधील मेळाव्यावरून राज ठाकरे पुन्हा परतत नाही तोच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीच्या ऑफिसची तोडफोड केल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यात आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com