Uday Samant News: महायुतीमध्ये काहीतरी घडतंय, बिघडतंय, एकनाथ शिंदे नाराज...? उदय सामंत खरं काय ते बोलून मोकळे झाले

Mahayuti News: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पुढची तरूण पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे आणि आता तेजस ठाकरे हे ही राजकीय आंदोलनात दिसले. यावर ठाकरे घराण्याची नवी पिढी राजकारणात येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिला.
Eknath Shinde | Uday Samant
Eknath Shinde | Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News : महायुतीमध्ये काहीतरी घडतंय, बिघडतंय अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवारी, अचानक आपल्या दरेगावचा केलेला दौरा यावरून विरोधक शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना हवा देत असतात. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या चर्चा म्हणजे विरोधकांचा फेक नरेटिव्ह असल्याचे म्हटले आहे.

मंत्री उदय सामंत यांनी यावेळी नाराजीच्या नावानं दरमहा फेक नरेटिव्ह सेट करणं हाच विरोधकांचा धंदा बनला असल्याची टीका केली आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेसाहेब पंतप्रधानांना भेटले किंवा आपल्या गावी गेले की, काहींच्या पोटात दुखतं. ते दिल्लीत जाओ की गल्लीत विरोधकांना पोटशूळ उठतोच, असा खोचक टोलाही सामंत यांनी लगावला.

वैयक्तिक कामामुळे एखाद्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, तर लगेच ते नाराज असल्याचा फेक नरेटिव्ह विरोधकांकडून सेट केला जातो. महायुतीमध्ये अजिबात कोणी कोणावर नाराज नाही, हा फक्त विरोधकांचा राजकीय स्टंट आहे.

दर महिन्याला एकनाथ शिंदे नाराज असल्याचा बनावट प्रचार करणे हा विरोधकांचा कायमस्वरूपी डाव आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून विरोधकांकडे सध्या जनतेच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही. त्यामुळेच असे फेक नरेटिव्ह तयार करण्याचे उद्योग सुरू असतात.

Eknath Shinde | Uday Samant
Amit Shah News: संयम संपला..! अमित शहांचा राहुल गांधींसह विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला मोठा इशारा, '2029 मध्ये त्यांनी मोठ्या पराभवाला...'

दुष्काळात उद्योजकांनी पुढे यावं..

येत्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाण्याची गंभीर टंचाई होण्याची शक्यता असून परिस्थिती भयावह आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. पाण्याचा पुनर्वापर आणि टर्शरी वॉटर प्रकल्पांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विशेष बैठका घेतल्या जातील.

तसेच मुंबईत मोठ्या उद्योजकांसोबत सीएसआर फंडसंदर्भात बैठक झाली असून, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचे आवाहन केले आहे. स्थानिक उद्योजकांनीही या संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

Eknath Shinde | Uday Samant
Modi Government News: मोठी बातमी: आंदोलनं, मोर्चांनी घेरलेल्या मोदी सरकारला धक्का, आणखी एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

...म्हणून गाड्यांची खरेदी..

राज्यासह मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकारकडून मात्र कोट्यावधी रुपये नवीन गाड्या खरेदीवर खर्च केले जात आहेत. यावरून शिवसेनेचेच आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त करत दुष्काळात अशा प्रकारची खरेदी चुकीचे असल्याचे म्हटले होते.

यावर सामंत यांनी ​​प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी कनेक्टिव्हिटी चांगली ठेवणे गरजेचे असते. यासाठीच सरकारी गाड्या खरेदीचा निर्णय घेतला असावा, असे सांगत निर्णयाचे समर्थन केले.

ठाकरेंच्या नव्या पिढीचे स्वागतच..

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पुढची तरूण पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे आणि आता तेजस ठाकरे हे ही राजकीय आंदोलनात दिसले. यावर ठाकरे घराण्याची नवी पिढी राजकारणात येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिला. त्यांना स्वीकारायचे की नाकारायचे हे जनता ठरवेल, हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com