Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, दिलेला शब्द पाळणार'; उदय सामंतांचे आश्वासन, पण तारीख गुलदस्त्यात!

Uday Samant On Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 2100 रुपये दिले जातील असे मोठे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
Ladki Bahin Yojana; Uday Samant
Ladki Bahin Yojana; Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ratnagiri News : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला आता दोन वर्षे पूर्ण होताना दिसत आहेत. मात्र, अद्याप लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळालेले नाहीत. त्यामुळे वाढीव 2,100 रुपये नेमके कधी मिळणार? असा सवाल लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे.

यादरम्यान, राज्यातील महायुती सरकारमधील उद्योगमंत्री तथा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2 हजार 100 रुपये देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी 1 हजार 500 रुपयांवरून 2 हजार 100 रुपये करण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद (खंडाळा) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Ladki Bahin Yojana; Uday Samant
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अन् दुष्काळावर भाष्य करताना मंत्री झिरवाळांची मोठी कबुली; म्हणाले, "सरकारला आर्थिक नियोजन..."

सामंत यांनी लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार असून, ही योजना कुणीही बंद करू शकत नाही, असेही सांगितले. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये दिले जातील. महिलांच्या आरोग्यासाठी हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही सामंत यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द आम्ही पाळणार असून, योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देणार असल्याचे सामंत यांनी पुन्हा स्पष्ट केले. मात्र, ही योग्य वेळ नेमकी कधी येणार, याबाबत त्यांनी कोणतीही अधिकची माहिती दिलेली नाही.

Ladki Bahin Yojana; Uday Samant
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची e-KYC पुन्हा सुरू झाली? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचे सत्य आले समोर

दरम्यान, महायुतीचे नेते वारंवार योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत. निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळणार असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात वाढीव रक्कम कधी मिळणार, असा सवाल आता राज्यातील लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.