Uddhav Thackeray : काँग्रेस नेत्याच्या प्रवेशानंतर ठाकरेंचा इशारा, म्हणाले, 'फक्त कोकणात पाय ठेवा! बघू, कोण मध्ये येतय?

Uddhav Thackeray On Betkar Join Shivsena : कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी आज मातोश्रीवर शिवबंधन बांधत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
Uddhav Thackeray On Betkar Join Shivsena
Uddhav Thackeray On Betkar Join Shivsenasarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : ठाकरे गटाला उतरती कळा लागली असतानाच कोकणात बुस्टर मिळाला आहे. येथे कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात आज (ता. 8) प्रवेश करत शिवबंधन हातात बांधले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

या प्रवेशानंतर सहदेव बेटकर यांनी, रमेश मोरेंच्या आशिर्वादाने आपण मातोश्रीवर आल्यानंतर 1992 साली बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन मिळाले. तेव्हापासून मातोश्रीच्या मी संपर्कात आहे. आता मी, माझ्या घरात पुन्हा आल्याचे म्हटलं आहे. यावेळी ठाकरे यांनी, “सहदेव एवढया जोरात बोलला की, हा आवाज तळ कोकणापर्यं गेला असेल. मला आणखी काही बोलण्याची गरज वाटत नाही. तर खरचं आज दत्ता यांचं कौतुक असून स्वत:चा वाढदिवस असतानाही ते शिवसेना वाढवण्यासाठी धडपडत आहेत. दत्तासारखे अनेक शिवसैनिक राज्यभर असून त्यांच्याच जीवावर ही शिवसेना आहे. ते शिवसेवना वाढवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

तसेच संजय तुम्ही फक्त आता कोकणात एक पाऊल टाका, मी आता कोकणाकडे बघणार नाही, तिकडे पाऊल टाकणार नाही. तुम्हीच कोकण पिंजून काढा, बघू, कोण मध्ये येतय ते, असाही दम ठाकरे यांनी राणेंसह उदय सामंत यांचे नाव न घेता भरला आहे. लोकसभा विधानसभेवेळी कोकणातला निकाल अनपेक्षित होता, असेही म्हटलं आहे. तर आता त्या विजयाच्या सूरस कथा बाहेर येत असून ज्यांनी थापा मारल्या त्यांना आता आपले हाथ वर केले आहेत. यामुळेच आता शिवसेनेची गरज राज्यातील जनतेला असून 'शब्दाला जागणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना' असल्याचेही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray On Betkar Join Shivsena
Uddhav Thackeray: उद्ध्वस्त झालेला कोकणचा गड ठाकरेंसाठी आता अवघड

यावेळी संजय राऊत यांनी, "महाभारतातील तीन प्रमुख पात्र आज इथे एकत्र आले आहेत. उद्धव म्हणजे श्रीकृष्ण, संजय तर आहेच आणि आता सहदेवही आला आहे. महाभारतातील सहदेव हे फार महत्वाचे पात्र असून तो धर्मराजाच्या अत्यंत जवळचा होता. तो आता श्रीकृष्णाच्या जवळ आल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

आता सहदेवाच्या येण्याने आजच्या कुरुक्षेत्रावर सुरू असणाऱ्या महायुद्धातील लढाईला बळ मिळाले आहे. कोकणात हे युद्ध सुरू असून ते आपणच जिंकणार आहोत. यामुळे आता रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा करुन तेथील ठेकेदारांच राज्य उलथवून टाका, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केलं आहे.

Uddhav Thackeray On Betkar Join Shivsena
Uddhav Thackeray : कोकणात दोस्तीत कुस्ती! ठाकरेंनी रत्नागिरीत काँग्रेसचा बडा नेता फोडला

तसेच राऊत यांनी, उद्धव ठाकरे यावेळी इतकच सांगेन की, कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना आहे. बाहेरच्या हवेची दिशा बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही फक्त कोकणात एक दौरा करा, त्या भूमीवर एक पाऊल ठेवा पहा कशी दाणादाण उडते. औषधाला देखील एक गद्दारही राहणार नाही, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com