
थोडक्यात बातमीचा सारांश :
उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाजप-शिवसेना युतीवर टीका करत राज ठाकरे यांच्याशी युती 'खुलीपणे' करू असे विधान केले.
यावर माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देताना, उद्धव ठाकरे 'भिकेचा कटोरा' घेऊन उभे असल्याची टीका केली.
राज ठाकरे यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे.
Ratnagiri News : राज्य सरकारला हिंदी सक्ती रद्द करायला भाग पाडल्यानंतर 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंनी विजयी मेळावा घेतला. यानंतर आता ते कायमचे एकत्र आले आहेत. त्यांच्यात युती होणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाजप-शिवसेना युतीवर टीका केली होती. त्यांनी, आम्हाला राज ठाकरेंशी युती करायची असेल तर ती खुलेपणाने करू, चोरुन मारून नाही, असे म्हटले होते. यावरून शिवसेनेतल्या बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. या नेत्याने उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत, पण राज ठाकरे अद्याप काहीच बोलत नसल्याचा टोला लगावला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध शिवसेना (ठाकरे) असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'साठी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राऊत यांनी ठाकरे बंधुंच्या युतीबाबत सवाल केला होता. याच प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. त्यांनी, राज ठाकरेंशी युती करायची असेल तर आम्ही खुलेपणाने करू. पण चोरुन मारुन काहीही करणार नाही असे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान आता याच स्पष्टीकरणावर रामदास कदम यांनी ठाकरेंना डिवचले आहे.
त्यांनी, एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतो. हे काय बिहार आहे का? देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दर वाट्टेल ते बोलतो. एकनाथ शिंदेंना तर नको नको ते शब्द वापरायचे आणि नंतर पंतप्रधान मोदींच्या पायावर लोटांगन घालून मला आणि मुलाला वाचवा असं साकडं घालायचं काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींकडे ठाकरे यांनी अशी गयावया ही दिशा सालियन प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी केल्याचा दावाही केला आहे. तर ठाकरेंना वाटतं असेल की मांजरा सारखं डोळे झाकून काही गोष्टी केल्या म्हणजे कोणाला कळणार नाही. पण सगळ्यांना ते दिसतं. मलाही मला अनेक गोष्टी माहीत आहेत. कशा पद्धतीने क्लिन चिट मिळाली तेही माहिती आहे. मी न्यायालयावर काही बोलणार नाही.
पण उद्धव ठाकरेंचं राजकारण आता संपल असून आम्हाला भाजपासोबत घ्या आणि एकनाथ शिंदेंना बाजूला करा, अशा अटी का घालता असाही सवाल कदम यांनी केला आहे. तर राज ठाकरेंपुढे भिकेचा कटोरा घेऊन उद्धव ठाकरे उभे असल्याचीही टीका कदम यांनी आहे. यावेळी त्यांनी, राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे असून राज ठाकरे अजून कुठे काय बोलले नाहीत. पण हेच त्यांच्या मागे, बाबा तू माझ्यासोबत ये म्हणत आहेत.
आता ज्यांना मराठी माणूस आठवत आहे. तो मुंबईत शिल्लक आहेच किती? मुंबईतल्या मराठी माणसाला कोणी संपवलं? विरार, नालासोपाऱ्यात ढकलण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलं. देशाचे पंतप्रधान मोंदीनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला किमान त्यांच्याबद्दल तरी चांगले शब्द वापरायचे. पण यांचा महापालिका आपल्या घशात घालण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पण मुंबईच्या जनतेला यांचा डाव कळाला असून ते त्यांना भीक घालणार नाही, असंही रामदार कमद यांनी म्हटलं आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
1. उद्धव ठाकरे यांनी काय विधान केले आहे?
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी युती करायची असेल, तर ती खुलीपणे करू, चोरून नाही, असे विधान केले.
2. रामदास कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली?
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत, "ते भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत" असे म्हटले.
3. राज ठाकरे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
सद्यस्थितीत राज ठाकरे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.