Uddhav Thackeray News : कोकणात राजकीय भूकंपाला सुरुवात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; साळवींचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

ShivsenaUBT Politics In Kokan : राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर काही दिवसांपूर्वीच राजन साळवींनी आक्रमक पवित्रा घेत थेट 'मातोश्री'गाठली होती. यावेळी त्यांनी आपल्या पराभवाला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर उद्धव ठाकरेंसमोरच गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधातील तक्रारींचा वाढा वाचला होता.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : लोकसभेसह विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठं अपयश आलं. यातच आता एकापाठोपाठ एक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत पुढची राजकीय चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशातच आता रत्नागिरीत ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरेंचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजीनामा देत ठाकरेच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साळवी यांच्या रुपाने शिवसेनेसाठी कोकणातला हा मोठा धक्का मानला जात आहे. ते शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

बंड्या साळवी यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर रत्नागिरीतील शिवसैनिक विकासापासून वंचित राहिला असल्याचा ठपका ठाकरेंवर ठेवत आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Shivsena News
Murlidhar Mohol: कुंभमेळ्याची वाट खडतर; प्रयागराजकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकीटदरात चौपट वाढ; हवाईमंत्री मोहोळ म्हणतात...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचा ओढा वाढला आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे मोठ्या विजयानंतरही महायुती स्थानिकसाठी कामाला लागली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी अजून शांत आहे. अशातच शिंदेंनी ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर काही दिवसांपूर्वीच राजन साळवींनी आक्रमक पवित्रा घेत थेट 'मातोश्री'गाठली होती. यावेळी त्यांनी आपल्या पराभवाला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर उद्धव ठाकरेंसमोरच गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधातील तक्रारींचा वाढा वाचला होता.

Shivsena News
Nawab Malik Case : मोठी बातमी: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीप्रकरणात पोलिसांना न्यायालयाचा 'मोठा' आदेश

यावेळी संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी साळवींना पक्षातून काढू टाकू का असा सवाल करत तुम्हांला भाजपात जायचं असेल तर जा असंही सुनावल्याची चर्चा होती. आता याच ठाकरेंना कोकणात बंड्या साळवींच्या रुपानं पहिला झटका बसला आहे. आगामी काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या वाटेवर अनेक मोठे नेते असल्याची जोरदार चर्चा असून ठाकरेंना मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com