ठाकरे गटात खिंडार! सामंत बंधूंसह सुकन्या अपूर्वाही राजकीय मैदानात, ठाकरेंना मोठा धक्का देत विश्वासू समर्थकांसह महत्त्वाचे नेते फोडले

Samant Bandhi Politics Against Shivsena UBT : गणेशोत्सवाचे औचित्य साधत सामंत बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. त्यांनी या गाठीभेटीतून आगामी स्थानिकची तयारी सुरू केली असून गणपती बाप्पा मोर्या म्हणत शिवसेनाला मोठा धक्का दिला आहे.
Uddhav Thackeray, Uday Samant
Uddhav Thackeray, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. तळ कोकणात आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  2. सामंत बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला.

  3. लांजा-राजापूर साखरपा मतदारसंघातील ठाकरे गटातील सरपंच आणि नेते सामंत गटात दाखल झाले.

  4. या हालचालींमुळे ठाकरे गटाची ताकद कोकणात पुन्हा कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

  5. सामंत बंधूंची ही रणनीती आगामी पंचायत, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांत महत्त्वाची ठरणार आहे.

Ratnagiri News : तळ कोकणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका लक्षात घेता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकी इतकीच चुरस या निवडणुकांत पाहायला मिळत असल्यानेच ग्रामिण भागात याला विशेष महत्व आहे. यादरम्याम गावाकडे आलेल्या कोकणवासीयांच्या मतपरिवर्तनासाठी स्थानिक नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. यात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना आमदार किरण उर्फ भैया सामंतही मागे नाहीत. या दोघांनी गणपती दर्शन कार्यक्रमात होती घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील ठाकरे गटातील सरपंचासह महत्वाच्या नेत्यांना फोडले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील 9 पंचायत समित्या, 8 नगरपालिका व नगरपरिषदेवर तसेच जिल्हापरिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. आठ महिन्यापूर्वी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींपैकी 250 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशातच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून लवकरच निवडणुका लागणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले असून सामंत बंधू राजापूर मतदारसंघात ॲक्शन मोडवर आले असून त्यांना मतदारसंघ पिंजून काढायला सुरूवात केली आहे.

Uddhav Thackeray, Uday Samant
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे राज ठाकरेंना आजपर्यंतचा 'हा' सर्वात मोठा मान देणार; शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले संकेत

गेल्या काही महिन्यात त्यांना संपर्कावर भर दिला असून प्रत्येक गावात दौरेही केले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लक्षात घेत त्यांनी आपले नेटवर्क स्ट्राँग करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा सामंतही गेले काही महिने मतदारसंघात अॅक्टिव्ह झाल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुरूंग लावले जात आहे.

गणेशोत्सवाचे औचित्य साधून गावा गावात सुरू केलेल्या संपर्कातून दोन्ही बंधूंनी वैयक्तिक गाठीभेटी घेत पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. लांजा राजापूर साखरपा मतदारसंघातील ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील ठाकरे गटातील ताम्हणे सरपंच समीक्षा बावस्कर यांच्यासह महत्वाचे नेते सामंत बंधुंनी गळाला लावले आहेत.

सरपंच समीक्षा बावस्कर यांच्यासह ठाकरे गटाचे खंदे समर्थक असलेले ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र सावंत, शाखाप्रमुख भाई अडसूळ यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी काही ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या धोरणांवर व आमदार किरण सामंत यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून या भागातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल विभागात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाला असून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.

यावेळी आमदार किरण सामंत यांनी, "माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्या प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पाचलसह संपूर्ण राजापूर तालुक्याचा विकास हा माझा ध्यास आहे. आपल्या सर्वांच्या सोबत काम करताना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही," असा शब्दही त्यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

Uddhav Thackeray, Uday Samant
Uddhav Thackeray : ठाकरेंना धक्क्यांवर धक्के सुरुच ! 15 वर्षांपासून सोबत असलेला विश्वासू नेता अचानक बाहेर

FAQs :

प्र. 1: सामंत बंधू कोण आहेत?
उ. उदय सामंत हे उद्योग मंत्री असून त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैया सामंत शिवसेनेचे आमदार आहेत.

प्र. 2: त्यांनी कोणत्या नेत्यांना आपल्या गटात आणले?
उ. लांजा-राजापूर साखरपा मतदारसंघातील ठाकरे गटातील सरपंच आणि महत्त्वाचे नेते सामंत गटात दाखल झाले.

प्र. 3: या हालचालींचा निवडणुकांवर काय परिणाम होईल?
उ. ठाकरे गटाच्या ताकदीत घट होऊन सामंत बंधूंचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

प्र. 4: हा निर्णय केव्हा घेण्यात आला?
उ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती दर्शन कार्यक्रमात या हालचाली झाल्या.

प्र. 5: ठाकरे गटासाठी हे किती धोकादायक ठरू शकते?
उ. स्थानिक स्तरावरील सरपंच आणि नेत्यांच्या स्थलांतरामुळे ठाकरे गटाला स्थानिक निवडणुकांत मोठा फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com