Uddhav Thackeray : ठाकरेंना धक्क्यांवर धक्के सुरुच ! 15 वर्षांपासून सोबत असलेला विश्वासू नेता अचानक बाहेर

Jalgaon politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा पक्ष खिळखिळा करण्याचे काम विरोधी पक्षांकडून सुरु आहे. एक-एक करत स्थानिक नेते गळाला लावले जात आहे.
Eknath Shinde ,  Uddhav Thackeray
Eknath Shinde , Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांनी मोठी इनकमिंग मोहीम राबवली. त्यात विशेषत: भाजप व शिवसेनेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लक्ष्य करत त्या पक्षातील स्थानिक नेते पदाधिकारी हे आपल्या गळाला लावले. त्यांना पक्षप्रवेश दिला. त्यातून जिह्यात ठाकरे गट खिळखिळा झाला.

आता पक्षातील ही गळती रोखण्याचा प्रयत्न सुरु असतानाच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. खडकेखुर्द (ता. एरंडोल) येथील महाराणा प्रतापसिंह जगदीश पाटील शैक्षणिक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांनी पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे जगदीश पाटील यांनी राजीनामा सुपुर्त केला आहे. त्यात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पाटील यांना शिंदे गटाने गळाला लावल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे जगदीश पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde ,  Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal : मराठ्यांना भिडले, आता मोठ्या हालचालींनी भुजबळ फार्म चर्चेत, नेमकं घडतंय काय?

यापूर्वीही शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात मतदारसंघातील पक्षाचे संघटन खिळखिळे होत चालले आहे. जगदीश पाटील यांच्या राजीनाम्याने त्यात मोठी भर घातली आहे.

माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाच्या माध्यमातून जगदीश पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. सुमारे पंधरा वर्षांपासून ते शिवसेनेचे पदाधिकारी होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमापासून ते काहीसे दूर राहिले.

Eknath Shinde ,  Uddhav Thackeray
Devendra Fadanvis Politics: बिऱ्हाड आंदोलन गुंडाळण्याचा मंत्र्यांचा डाव आंदोलकांनी उधळला? सरकारची डोकेदुखी कायम...

यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये तर काहींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गट खिळखिळा झाला आहे. याउलट भाजप व शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. या स्पर्धेत अजित पवार गटही काही मागे नाही. अजित पवारांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील अनेक दिग्गज याआधी आपल्या गळाला लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com