राणेंच्या गडाला हादरा; कुडाळ, देवगडमध्ये शिवसेनेने दिला धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा गड मानला जात असल्याने चार नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on: 
Updated on: 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना काही दिवसांतच मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या निवडणुकीत कुडाळ (Kudal) आणि देवगडमध्ये (Devgad) भाजपचा निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे राणेंच्या गडाला हादरा बसल्याची चर्चा सुरू आहे. तर दोडामार्ग व वैभववाडीमध्ये मात्र राणेंना सत्ता काबीज करण्यात यश मिळालं आहे.

कुडाळ नगरपंचायत एका मताने राणेंच्या हातून निसटली असून काँग्रेस (Congress) किंगमेकरच्या भूमिकेत आहे. निवडणुकीत भाजपला (BJP) आठ, शिवसेनेला (Shiv Sena) सात तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहे. भाजपच्या एका उमेदवाराचा एका मताने पराभव झाला आहे. याठिकाणी काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार यावर सत्तेचं गणित अवलंबून आहे. पण राणेंना एकहाती सत्ता मिळवण्यात अपयश आलं आहे.

Narayan Rane
कर्जतमध्ये रोहित पवार की राम शिंदे : कोण मारणार बाजी?

देवगड नगरपंचायतही भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवणुकीतही भाजपला सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. या नगरपंचायतीत भाजपला आठ, शिवसेनेला आठ आणि राष्ट्रवादी एक जागा मिळाला आहे. नितेश राणे यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक झाली. त्याचा फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत. ही नगरपंचायत भाजपचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला असल्याचे मानले जात होते.

वैभववाडीमध्ये (VaibhavWadi) राणेंनी एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपला नऊ जागा मिळाल्या असून शिवसेनेला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. अपक्षांना तीन जागा मिळाल्या. माजी खासदार निलेश राणे यांनी वैभववाडीमध्ये अधिक लक्ष घातलं होतं. ही नगरपालिकाही नितेश राणे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Narayan Rane
रोहित पवारांचीच सरशी; राम शिंदे जवळपासही नाहीत

कसई-दोडामार्ग नगपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालं आहे. मागील निवडणुकीत ही नगरपंचायत भाजप व शिवसेना युतीकडे होती. आता राणेंनी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना धक्का देत नगरंपचायत ताब्यात घेतली आहे. भाजपचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी एकान जागेवर समाधान मानावे लागले. एक जागा अपक्ष उमेदवाला गेली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती -

चार पैकी तीन नगरपंचायतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. वैभववाडी, दोडामार्ग मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कुडाळमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमतापासून दूर राहिला आहे. देवगडमध्ये भाजप व शिवसेनाला समान जागा मिळाल्या आहेत. चार नगरंपचायतींमध्ये भाजपाल सर्वाधिक 41 जागा मिळाल्या. शिवेसाना 20, काँग्रेस तीन तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या.

Narayan Rane
मंत्री विश्वजित कदम यांना जबर धक्का; कडेगावमध्ये भाजपची सत्ता

कुडाळ नगरपंचायत

भाजप - 8

शिवसेना -7

काँग्रेस - 2

देवगड-जामसांडे नगरपंचायत

भाजप - 8

शिवसेना - 8

राष्ट्रवादी - 1

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत

भाजप - 10

शिवसेना - 5

अपक्ष - 2

कसई-दोडामार्ग नगरपंचायत

भाजप - 14

शिवसेना - 1

राष्ट्रवादी - 1

अपक्ष - 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com