कर्जतमध्ये रोहित पवार की राम शिंदे : कोण मारणार बाजी?

ही निवडणूक भाजपचे ( BJP ) माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
Ram Shinde & Rohit Pawar
Ram Shinde & Rohit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

कर्जत ( जि. अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींसाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू होत आहे. यात कर्जत नगर पंचायतचा समावेश आहे. ही निवडणूक भाजपचे ( BJP ) माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. राम शिंदे यांनी रोहित पवारांवर दडपशाहीचा आरोप करत मौन आंदोलन व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर औत्सुक्याचा व चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार हे अवघ्या काही तासात समजणार आहे. In Karjat, Rohit Pawar or Ram Shinde : Who will win?

कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागांसाठी काल ( मंगळवारी ) शांततेत मतदान झाले. दहा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या निवडणुकीत सरासरी 87.05 टक्के मतदान झाले. हा वाढलेला टक्का हमखास विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकविणारा आहे. या निवडणुकीत एक जागा बिनविरोध झाली असल्याने 16 प्रभागांतील मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात होणार आहे. राष्ट्रवादीची एक जागा पूर्वीच बिनविरोध झाली आहे.

Ram Shinde & Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, विकास करू शकणाऱ्या पक्षाला कर्जतची जनता सत्ता देईल

नगरपंचायतीची ही निवडणूक आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची राजकीय परीक्षा व सामर्थ्य जोखणारी ठरणार आहे. या निवडणुकीत आजी की माजी... कोण मारतो बाजी, याकडे तालुक्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

येथील नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली होती. 17 पैकी तब्बल 12 सदस्य निवडून आले होते. एका अपक्ष महिला सदस्याने भाजपला पाठिंबा दिला होता. तो पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता. काँग्रेसला चार जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. तरीही काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळविले. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधण्यात आमदार रोहित पवार यांना यश आल्याने निवडणुकीत रंगत आली. भाजपकडून माजी मंत्री राम शिंदेंनी एकाकी झुंज दिली. त्यामुळे आज कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या सारीपाटावर काय नोंदलं जाणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे.

Ram Shinde & Rohit Pawar
राम शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षांत कर्जतच्या जनतेचा अपेक्षाभंग झाला...

निकालावर लागल्या पैजा

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार झाली. पहिल्या टप्प्यात अनेकांनी सावड फेडल्याची चर्चा आहे. यामुळे सोळा प्रभागांतील कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार, याबाबत शहरात पैजा लागल्या आहेत.

Ram Shinde & Rohit Pawar
रोहित पवार-राम शिंदे, पिचड, लंके, औटी यांच्या गावातील मतदानाकडे लक्ष

प्रभागनिहाय मतदान

पुरुष, स्त्री आणि एकूण (कंसात टक्केवारी)

प्रभाग 1 - गायकरवाडी - 346 + 310 = 656 (97.47 टक्के)

प्रभाग 3 - ढेरे मळा - 518 + 461 = 979 (85 टक्के)

प्रभाग 5 पोस्ट ऑफिस परिसर - 318 + 304 = 622 (84.74 टक्के)

प्रभाग 7 - बुवासाहेबनगर - 331 + 302 = 633 (80.53 टक्के)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com