Vaibhav Naik : 'खरे राणे असाल तर माझ्याविरूद्ध निवडणूक लढवूनच दाखवा!'

Vaibhav Naik : यापूर्वीच मी नारायण राणेंना धूळ चारली आहे, असेही नाईक म्हणाले.
Vaibhav Naik & Nilesh Rane
Vaibhav Naik & Nilesh RaneSarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांना जाहीर आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर राणे यांनी विधानसभेत माझ्या विरोधात निवडणूक लढवूनच दाखवावी, असे खुले आव्हानच त्यांनी राणेंना दिले. यापूर्वीच मी नारायण राणेंना धूळ चारले आहे,जर तुम्ही खरे राणे असाल, तर माझ्या विरूद्ध आगामी विधानसभेला उभे राहून दाखवा, असे नाईक यांनी राणेंना डिवचले.

कुडाळामध्ये संविधान समर्थन रॅली आयोजित केली होती. यामुळे कुडाळमध्ये राजकीय पेटले आहे. वैभव नाईक हे कुडाळ पोलीस स्टेशनमध जाऊन, वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जातात तर मग भाजपचे नेते प्रक्षोभक भाषणं करत आहेत, मात्र त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल का केले जात नाहीत? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

Vaibhav Naik & Nilesh Rane
‘वैभव नाईक कितीही मोर्चे काढा; हे शिंदे-फडणवीस सरकार आहे, चुकीला माफी नाही’

भाजपकडून वैभव नाईक यांना अटक करा अशी मागणी होत आहे. तुम्ही दबावतंत्राचा वापर करणार पण तुमच्या या दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही.

Vaibhav Naik & Nilesh Rane
‘राणे ९० च्या दशकात काय करत होते...कुणाच्या हत्येच्या सुपाऱ्या दिल्या, हे सर्वांना माहिती आहे’

माझं व्यवहार आणि माझं चारित्र्य स्वच्छ आहे, पण तरीही मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला तरी, मी भाजपमध्ये जाणार नाही आणि मी शिवसेना कधीही सोडणार नाही. मी जेलमध्येही जाईन पण शिवसेना कधीच सोडणार नाही, अशी ठाम भूमिका वैभव नाईक यांनी घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com