

Badlapur Crime News : बदलापूरच्या वांगणी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळला असून दोन सदस्यांमधला वाद विकोपाला गेला आहे. तीव्र राजकीय वादामुळे इथले राजकारण चांगलंच तापलं असून थेट उपसरपंच अमित शेलार यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य रूपेश गवळी यांना बड्या ठोकण्यात आल्या आहेत. पण रूपेश गवळी यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. आरोपी असतानाही अद्याप अमित शेलार यांना अटक झालेली नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
बदलापूरच्या वांगणी ग्रामपंचायतीत दोन सदस्यांमधला वाद वाढला असून एकमेकांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. उपसरपंच अमित शेलार यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर रूपेश गवळी यांना अटक झाली आहे. पण उपसरपंच अमित शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही कारवाई झालेली नाही. उलट शेलार टीडीसीसी बँकेच्या निवडणूक प्रचारात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत फिरताना दिसले आहेत.
एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या सदस्यावर कारवाई होत असताना मात्र उपसरपंच अमित शेलार यांच्यावर कारवाई होत नाही. यामागे भाजपचा हात असून त्यांचा पोलिसांवर दबाव असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
रूपेश गवळी यांना अटक होण्यापूर्वी अंतर्गत वादातून काहीच दिवसांपूर्वी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तर ही घटना सीसीटीव्हीत कैदही झाली होती. तर या घटनेमागे उपसरपंच अमित शेलार यांचा हात असून त्यांनीच याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या आरोपवरून उपसरपंच अमित शेलार यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
यानंतर काहीच दिवसांनी अमित शेलार यांच्या कार्यालयाची काही गुंडांनी तोडफोड करत दहशत माजवली. ही घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी तपास केला आणि यात रूपेश गवळी यांना कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.