Video Ajit Pawar : शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती, नाव न घेता अजितदादांची कबुली

Ajit Pawar Sharad Pawar : मंत्री बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्रम-हुलगेकर या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उद्देशून अजितदादांनी घरात फूट न पाडण्याचा सल्ला दिला.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती, अशी नाव न घेता कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. घरात फूट पाडू नका. ती चूक मी केलीये. ती तुम्ही करू नका, मी त्या अनुभवातून गेलोय अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केली. या संदर्भात वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

मंत्री बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्रम-हुलगेकर या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उद्देशून अजितदादांनी घरात फूट न पाडण्याचा सल्ला दिला.

अजित पवार म्हणाले, तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा. वडिलांचं जेवढं प्रेम लेकीवर असतं तेवढं प्रेम कोणीच करू शकत नाही. येवढं सगळं असताना कुठतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. त्यासंदर्भामध्ये आम्ही पण अनुभव घेतलाय. मी माझी चूक मान्य केली.

धर्मरावबाबा आत्रामांची जावयाला धमकी?

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार? माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानामधून तलवार बाहेर काढणार. आमचे घराणे हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असं आपल्या जावयाचे आडनाव घेत धर्मरावबाबा आत्राम यांनी जावयाला धमकी देखील दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com