Supriya Sule Vs Sunetra Pawar : "भावाची बायको ही आईसमान असते तिचा सन्मान करा अन्...", शिंदे गटाचा सुळेंना टोला

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीतील लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. या वादात शिंदे गटानंही उडी मारली आहे.
sunetra pawar supriya sule
sunetra pawar supriya sulesarkarnama
Published on
Updated on

बारामती लोकसभा मतदार संघातील ( Baramati Lok Sabha Constituency ) निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. "भाजपनं माझ्या आईला लोकसभा निवडणुकीत उतरवलं," अशी उद्गिग्न प्रतिक्रिया सुप्रिया सुळे व्यक्त केली होती. यावरून शिंदे गटानं सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

"मी लीड साठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढत आहे. भाजपचे नेते बारामतीत येऊन विकासाच्या गोष्टी करण्याऐवजी पवारांचा पराभव करण्याची वक्तव्य करत आहेत. आमचं घर फोडून आमच्याच घरातील एक महिला त्यांना उमेदवारी म्हणून लागत आहे. मोठी वहिनी ही आईच्या समान असते. भाजपनं माझ्या विरोधात आईला लोकसभा निवडणुकीत उतरवलं आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.

"सुळेंनी भावाला बक्षीस द्यावं"

सुळेंच्या याच वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट टोलेबाजी केली. "मोठ्या भावाची बायको ही आईसमान असते तिचा सन्मान करा आणि तिला निवडून आणा. कुटुंबातील मतभेद भाजपमुळे होत असल्याचं सुळेंना वाटत आहे. त्यामुळे संस्कृती पाळून भावाला बक्षीस देत वहिणींच्या प्रचाराला सुळेंनी सुरूवात करावी," असा टोमणा शिरसाटांनी लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ही जनतेची निवडणूक असल्याचं म्हटलं आहे. "ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे. त्यामुळे ही जनतेची लढत आहे," असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com