Political News : लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र, सी वोटरच्या ओपिनियन पोलने महायुतीसह महाविकास आघाडीची देखील चिंता वाढली आहे. तर, छोट्या पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सी वोटरच्या ओपनियन पोलनुसार मार्च महिन्यात राज्यात एनडीएला (NDA) 43 टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर इंडिया आघाडीला 42 टक्के लोकांनी पसंती दिली होती. मात्र, एप्रिल महिन्यात दोघांच्या आकडेवारील घट झाली आहे. एप्रिलमध्ये एनडीएच्या आकडेवारीत दोन टक्क्यांनी घट झाली आहे. 43 टक्क्यांवरून एनडीए आकाडी 41 टक्क्यांवर आली आहे. तर इंडिया, महाविकास आघाडी 42 टक्क्यांवरून 41 टक्क्यांवर आली आहे.
अन्य पक्षांना मार्चमध्ये 15 टक्के लोकांनी पसंती दिली होती. एप्रिलमध्ये ही आकडेवारी तीन टक्क्यांनी वाढली आहे. आता हा आकडा 18 टक्क्यांवर पोहचला आहे. महाराष्ट्रात महायुतीमध्ये महायुतीमध्ये भाजपसोबत (BJP) एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, रामदास आठवलेंची आरपीआय, महादेव जानकरांचा रासप सहभागी आहे तर, महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी सहभागी आहे. या महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीत नव्या आकडेवारीमुळे काटे की टक्कर असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.