Mahavitaran Fraud Case : बनावट गॅरंटीचा ‘करंट’! महावितरणला 122 कोटींचा गंडा; आर्थिक गुन्हे शाखेचे 'मल्टीस्टेट रेड'

Mahavitaran fake bank guarantee fraud case: महावितरणची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चार कंपन्यांविरोधात सहा ठिकाणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी छापेमारी केली.
₹122 crore fraud against Mahavitaran
₹122 crore fraud against MahavitaranSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra power company financial scam: महावितरणची चार कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देत 122.84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सहा ठिकाणी छापे घातले आहे.

मुंबई, ठाण्यासह दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात पोलिसांनी छापे घातले आहेत. पोलिसांना या कारवाईत, गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे कागदोपत्रं आणि डिजिटल पुरावे जप्त केली आहेत.

सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन चार खासगी कंपन्यांनी महावितरणकडे (Mahavitaran) बनावट बँक गॅरंटी सादर करून वीज खरेदी करार केले. कराराच्या अटींप्रमाणे आर्थिक समापन (फायनान्शियल क्लोजर) करणे टाळले.

या कंपन्यांनी कंत्राट घेताना सादर केलेल्या एकूण 122.85 कोटींच्या बँक (Bank) गॅरंटी रोखीकरणासाठी बँकेत सादर केल्या. त्या बनावट असल्याचे बँकेकडून महावितरणला समजले. 20 फेब्रुवारीला आर्थिक गुन्हे शाखेने या चार कंपन्यांविरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

₹122 crore fraud against Mahavitaran
BJP MLA Bribery Row : ‘11 लाखांच्या लाचेचा खेळ’ भाजप आमदाराला महागात; कोठडीची हवा, पक्षाची इमेज डॅमेज!

बनावट बँक गॅरंटी खरी असल्याचे भासवून सादर करून कोट्यवधींची फसवणूक केल्याने महावितरणकडून मेसर्स नॅकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड-मेसर्स एनओपीएल प्रोजेक्ट्स प्रा. लि., मेसर्स इंटिग्रेशन इंडक्शन पॉवर लिमिटेड-मेसर्स आयआयपीएल हिंगोली प्रा. लि.-मेसर्स आयआयपीएल परभणी प्रा. लि., मेसर्स नॅकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड-मेसर्स एनओपीएल पेस ग्रीन एनर्जी प्रा.लि., मेसर्स ओनिक्स रिन्युएबल लिमिटेड-मेसर्स ओनिक्स आयपीपी लिमिटेड या कंपन्यांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.

₹122 crore fraud against Mahavitaran
Madhi Yatra Row : बस झालं! गुन्हा नोंदवा; 'AIMIM'चा थेट इशारा, मढी ग्रामपंचायतीचा ठराव ठरला वादाचा 'स्फोटबिंदू'

वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात...

सुमारे 100 कोटींची बनावट बँक गॅरंटी देणाऱ्या अन्य एका कंपन्यांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याचाही तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुन्ह्यात कंपन्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी सहकार्य करणारा महावितरणचा वरिष्ठ अधिकारी सध्या चौकशीच्या फेऱ्यात असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com