Teacher Bharti 2026 : ‘वशिल्याला’ रामराम! आता शिक्षक भरतीत फक्त गुणवत्ता; खासगी संस्थांची मनमानी सरकारने मोडली

Maharashtra government introduced strict new rules teacher recruitment, giving maximum weightage TET scores and academic qualifications while curbing arbitrary hiring practices private educational institutions : राज्यात 15 हजार शिक्षक भरतीसाठी नवे कडक नियम लागू करताना, टीईटीला 75 गुण देत, मुलाखतीत संस्थाचालकांचे वर्चस्व संपुष्टात आणत 90 टक्के भर शैक्षणिक पात्रतेवर असणार आहे.
Teacher Bharti 2026
Teacher Bharti 2026Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Teacher Recruitment 2026 : राज्यात शिक्षक भरतीत आता ‘वशिला’ नाही तर गुणवत्ता चालणार! राज्य सरकारने खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानीला लगाम घालत भरती प्रक्रियेसाठी नवे कडक नियम लागू केले आहेत.

यापुढे शिक्षकांची निवड केवळ मुलाखतीवर होणार नसून टीईटी गुण आणि शैक्षणिक पात्रतेलाच सर्वाधिक महत्त्व दिले जाणार आहे. मुलाखतीचे संपूर्ण अधिकार संस्थाचालकांकडे न ठेवता, 100 गुणांपैकी 90 गुण उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेवर अवलंबून असतील. यामुळे खासगी शिक्षण संस्थांमधील वर्षानुवर्षांची ‘मनमानी’ आता इतिहासजमा होणार आहे.

राज्यात जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांमध्ये तब्बल 15 हजार शिक्षकांची (Teacher) भरती होणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच 700 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. 31 मेपर्यंत संस्थांना रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानंतर टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना 50 खासगी संस्था आणि 100 जिल्हा परिषद शाळांचा प्राधान्यक्रम निवडण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. सरकारने संपूर्ण भरती प्रक्रिया 31 जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

या भरतीत कोणतीही पारंपरिक मुलाखत होणार नाही. थेट गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची (Student) निवड केली जाणार आहे. एकूण 100 गुणांपैकी तब्बल 90 गुण हे उमेदवाराच्या गुणवत्ता आणि पात्रतेवर आधारित असतील.

Teacher Bharti 2026
Indira Gandhi strategy : भारताने स्वतःच्याच विमानाचं हायजॅक घडवून आणलं अन् ऑपरेशन बांग्लादेश फत्ते झालं..!

यात टीईटीला 75 गुण, व्यावसायिक अर्हतेला 8 गुण आणि शैक्षणिक अर्हतेला 7 गुण असतील. संस्थांच्या हाती फक्त 10 गुण ठेवण्यात आले आहेत. त्यात पाच गुण व्यक्तिमत्त्व व संभाषण कौशल्यासाठी तर पाच गुण अध्यापन कौशल्यासाठी असतील.

Teacher Bharti 2026
Nagaradhyaksha powers terminated : नगराध्यक्षांना कायद्याचा दणका! जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली ‘आर्थिक अधिकारांची’ खरी मर्यादा

विशेष म्हणजे, मुलाखतींचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करणे संस्थांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या उमेदवाराने आक्षेप घेतल्यास शिक्षणाधिकारी थेट तपासणी करून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे खासगी संस्थांमधील वर्षानुवर्षे सुरू असलेल्या ‘मनमानी भरती’ला आता मोठा ब्रेक बसणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.

Teacher Bharti 2026
NEET UG News: नीट पेपर लीकनंतर मोठा निर्णय; पुढील वर्षी NEET ऑनलाइन होणार, शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com