Anganwadi Sevika Salary: अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी मोठी बातमी! प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलले; आता किती मिळणार पैसे?

Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper:अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलले; १० पैकी सात निकष पूर्ण केल्यास सेविकांना १,४०० रुपये, तर मदतनीसांना ७०० रुपये मासिक भत्ता मिळणार.
Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper
Incentive Allowance For Anganwadi Sevika and HelperAI
Published on: 
Updated on: 

Anganwadi New GR 2026 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये महिला व बालविकास विभागाने सुधारणा केली आहे.

त्यानुसार आता अंगणवाडी केंद्रांच्या कामगिरीचे दरमहा दहा निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. यापैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रातील सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे, किती निकष पूर्ण केले आहेत, यावर भत्त्याची रक्कम ठरणार आहे.

महिला व बालविकास विभागाने यासंदर्भातील नुकताच निर्णय घेतला आहे. याबाबत अध्यादेश (GR) काढला आहे. यापूर्वी २४ जून २०२५ रोजी निश्चित करण्यात आलेले प्रोत्साहन भत्त्याचे निकष आता बदलण्यात आले आहेत. सुधारित निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे चालू महिन्यापासूनच अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचे नव्या पद्धतीने मूल्यांकन केले जाणार आहे.

दहा निकषांवर होणार अंगणवाडी केंद्रांचे मूल्यांकन

नव्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी केंद्रांना दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम (CBE) आयोजित करून त्यांची पोषण ट्रॅकरवर नोंद करावी लागेल. नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना २५ दिवस घरपोच आहार (THR) वितरित करणे आवश्यक आहे. तसेच तीन ते सहा वर्षे वयोगटातील किमान ८० टक्के बालकांची २५ दिवस दैनंदिन उपस्थिती असणे अपेक्षित आहे.

Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper
CET Exam: पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले? चिंता नको! वर्षातून दोनदा CET देण्याची संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक

याशिवाय, याच वयोगटातील ९५ टक्के बालकांना महिन्यातील किमान २५ दिवस गरम ताजा आहार आणि सकाळचा नाश्ता देणे बंधनकारक असेल. दरमहा एकदा VHSND म्हणजेच आहार आरोग्य दिन आयोजित करून त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद करावी लागेल. अंगणवाडी केंद्र महिन्यात किमान २५ दिवस सुरू ठेवणेही आवश्यक आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यासाठी २४ दिवसांची अट ठेवण्यात आली आहे.

Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper
Teacher News: शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून 'डिजिटल असहकार'! प्रशासकीय WhatsApp ग्रुप सोडणार; ऑनलाइन कामांनाही नकार

तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी महिन्यात किमान दोन पूर्वशालेय शिक्षण उपक्रम राबवावे लागतील. तसेच शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ९८ टक्क्यांपेक्षा जास्त बालकांची वयानुसार उंची आणि वजनाची अचूक नोंद असणे आवश्यक आहे. यासोबतच पोषण ट्रॅकरमध्ये दर्शविलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या गृहभेटी पूर्ण करणे हा दहावा निकष आहे.

सात निकष पूर्ण केल्यास १,४०० रुपयांपासून भत्ता

या दहा निकषांपैकी किती निकष पूर्ण झाले, त्यानुसार सेविका आणि मदतनीसांना स्वतंत्र प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.

अंगणवाडी केंद्रांचे मूल्यांकन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे दरमहा केले जाणार आहे. त्यानुसार किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रातील सेविका आणि मदतनीसांना सुधारित दराने भत्ता मिळेल.

Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper
Graduate Teachers Salary: न्यायालयाच्या निकालानंतर S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास शिक्षकांचा पगार किती? हातात मिळणार 60 हजार!

नोव्हेंबरपासूनच सुधारित निकष लागू

या शासन निर्णयातील नवीन निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, यापूर्वीच्या कालावधीतील प्रोत्साहन भत्त्याचे वितरण करताना नवीन निकष लागू होणार नाहीत. त्यासाठी संबंधित कालावधीत अस्तित्वात असलेल्या जुन्या निकषांचाच आधार घेतला जाणार आहे.

राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या प्रोत्साहन भत्त्याचा अतिरिक्त खर्च महिला व बालविकास विभागाच्या संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येणार असल्याचेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper
SharanKumar Limbale: 'बेळगाव काय पाकिस्तानात आहे का?' शरणकुमार लिंबाळेंच्या एका वक्तव्याने वाद; राजीनाम्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक

काय आहेत सुधारित निकष

सुधारित निकषांनुसार, सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील सेविकांना दरमहा १,४०० रुपये, तर मदतनीसांना ७०० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आठ निकष पूर्ण केल्यास सेविकांना १,६०० रुपये आणि मदतनीसांना ८०० रुपये मिळतील. नऊ निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रातील सेविकांना १,८०० रुपये, तर मदतनीसांना ९०० रुपये भत्ता दिला जाईल. त्याचप्रमाणे, सर्व दहा निकष पूर्ण केल्यास अंगणवाडी सेविकांना दरमहा २,००० रुपये आणि मदतनीसांना १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

पूर्ण केलेले निकष, अंगणवाडी सेविकांचा मासिक भत्ता, मदतनीसांचा मासिक भत्ता (अनुक्रमे वाचा)

७ निकष ₹१,४०० ₹७००

८ निकष ₹१,६०० ₹८००

९ निकष ₹१,८०० ₹९००

१० निकष ₹२,००० ₹१,०००

Incentive Allowance For Anganwadi Sevika and Helper
NDA Gets Stronger: अकाली दलाची घरवापसी, तीन मित्रपक्षांची साथ; लोकसभेत एनडीएची ताकद 42 खासदारांनी वाढली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.