
खान्देशातील कॉंग्रेसची बुलंद तोफ कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतलं आहे. भाजपश्रेष्ठींच्या उपस्थित त्यांचा वाजत गाजत प्रवेश झाला आहे. 70 वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या गळाला लागले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते, त्यामुळे अशा लोकांबद्दल पुन्हा मला विचारू नका असं जाधव म्हणालेत त्यांनी 'नेपाळी वॉचमन' म्हणत नितेश राणेंवरही टीका केली.
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर व्हावा. यासाठी प्रयत्न चालू केले असून, त्या विरोधात आज मालेगाव येथे शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून, रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन, आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
हिंदी सक्तीविरोधातील शासन निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांना निमंत्रण देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. ५ जुलैला मराठी विजय दिवसाचे आम्ही तिघांनाही आमंत्रण देणार आहोत. तेव्हा त्यांनीही पाहावं की हा विजयी सोहळा नेमका काय आहे. त्यामुळे आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्याचं संजय राऊत म्हणाले.
पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या तासातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन केलं आहे. त्यानंतर पटोले भडकले असून जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल त्याला सभागृहातून निलंबित करायचं आणि जो शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात व शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना हे सरकार सन्मानाने वागवतं अशी टीका पटोले यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.