SSC HSC Exam: मोठी बातमी: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Student Exam Date : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी (ता.17 सप्टेंबर) जाहीर करण्यात आले आहे.
SSC HSC Board
SSC HSC BoardSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी (ता.17 सप्टेंबर) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 या काळात होणार आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केल जात आहे. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या आगामी बारावी लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027 होणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ही 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या दरम्यान पार पडणार आहे.

तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027 तसेच प्रात्यक्षिक,श्रेणी,तोंडी परीक्षा ही 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

SSC HSC Board
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याच्या मातीतूनच केली मोठी मागणी; म्हणाले,'गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं पाहिजे...'

राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय शिक्षण मंडळातंर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. या नऊ विभागात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय शिक्षण मंडळांचा समावेश होतो.

इयत्ता बारावी अन् दहावीच्या परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येत असतो.काही महिने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यापाठीमागं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्तम तयारी करता यावी हा उद्देश असतो.

SSC HSC Board
Abdul Sattar : अब्दुल सत्तार अचानक भाजप आमदाराच्या मतदारसंघात सक्रिय; मंदिराला 5 लाखांची देणगी देत चाचपणी?

या बाबींचा सारासार विचार करता दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात येणार आले आहेत्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्‍या आठवडयापासून घेतली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com